Bombay High Court (Photo Credit: PTI)

आज आषाढी एकादशी सोबतच मुस्लिम बांधव बकरी ईद (Bakri Eid) चा सण साजरा करत आहे. बकरी ईदच्या दिवशी बकर्‍याचा बळी देण्याची प्रथा आहे. या रीतीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) बीएमसीला (BMC) आदेश दिले आहेत. ज्यामध्ये दक्षिण मुंबईत बकरी ईदला रहिवासी सोसायटी मध्ये अवैधपणे प्राण्यांचा बळी दिला जाणार नाही याची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. आज 29 जून दिवशी अनेक ठिकाणी बकरी ईद साजरी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर बुधवार, 29 जून दिवशी एक तातडीची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयामध्ये झाली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश G S Kulkarni आणि Jitendra Jain यांनी Nathani Heights society मध्ये बळी देण्यास परवानगी असल्याचं म्हटलं आहे मात्र त्यासाठी पालिकेकडून परवाना असणं गरजेचे आहे.

"महापालिकेने या ठिकाणी जनावरांची कत्तल करण्याचा परवाना जारी केला नाही तेथे, महापालिकेचे अधिकारी पोलिस कर्मचार्‍यांच्या मदतीने प्रस्तावित जनावरांची कत्तल रोखण्यासाठी कायद्यानुसार योग्य ती कारवाई करतील." असे न्यायालयाने सांगितले आहे. Bakari Eid 2023:जाणून घ्या बकरीद सणाचे महत्त्व; म्हणून दिली जाते बकरीची बळी. 

सोसायटीतील रहिवासी हरेश जैन याने दाखल केलेल्या याचिकेवर खंडपीठात प्राण्यांच्या कत्तलीवर पूर्ण बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. बीएमसीची बाजू मांडणारे वकील Joel Carlos म्हणाले की, संपूर्ण बंदी जारी केली जाऊ शकत नाही.

Carlos म्हणाले की, नागरी संस्थेचे अधिकारी सोसायटीच्या जागेची पाहणी करतील आणि काही उल्लंघन आढळल्यास, योग्य कारवाई केली जाईल. खंडपीठाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, जर कारवाई करायची असेल तर संबंधित पोलीस ठाण्याने महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना योग्य ते पोलीस सहकार्य करावे.