बकरी ईद निमित्त फ्लॅट मध्ये कुर्बानी देण्यास मनाई, मुंबई उच्च न्यायलायचा निर्णय
Mumbai High Court (Photo Credits: ANI/Twitter)

मुस्लिम धर्मीयांसाठी महत्वाचा मानला जाणारा बकरी ईद (Bakra  Eid 2019) हा सण येत्या 12 ऑगस्टला देशभरात साजरा होणार आहे. बकरी ईदच्या निमित्ताने प्राण्यांची  कुर्बानी देण्याची प्रथा अनेक वर्षांपासून सुरु आहे. अनेकदा या प्रथेवरुन वेगवेगळ्या वादाला तोंड फुटले होते. यंदाही, कुर्बानी साठी कत्तलखान्याबाहेर तसंच खासगी जागांसाठी देण्यात आलेल्या परवान्यांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) याचिका दाखल कऱण्यात आली होती. ज्यावर निर्णय देत उच्च न्यायालयाने बकरी ईदनिमित्त फ्लॅटमध्ये किंवा सोसायटी परिसरात कुर्बानी देण्यास मनाई केली आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार समुदायिक केंद्रात कुर्बानीची सोय असलेल्या ठिकाणी एक किलोमीटरच्या परिसरात कोणत्याही गृहनिर्माण सोसायटीला स्वतंत्र परवानगी देऊ नका असे आदेश देण्यात आले आहेत.

प्राप्त माहितीनुसार, बकरी ईद च्या निमित्ताने पालिकेतर्फे ऑनलाईन जाहिरात देण्यात आली होती, ज्यामध्ये तात्पुपत्या काळासाठी बकरे कटाईचे परवाना देण्याचे सूचित करण्यात आले होते. मात्र या विरुद्ध काही प्राणीमित्र संघटनांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली तसेच घरांमध्ये आणि सोसायटी परिसरात दिल्या जाणाऱ्या कुर्बानीलाही विरोध केला होता. प्राणी संरक्षण कायद्यासह महापालिकेच्या नियमांचं उल्लंघन होत असल्याचं याचिकेत सांगितले होते. बकरी-ईदच्या अगोदर कुर्बानी फोटोज शेअर करत सरफराज अहमद याने ओढवला चाहत्यांचा रोष, Netizens ने PETA कडे केली कारवाईची मागणी

दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयांनंतर पालिकेकडील सुमारे 8  हजार परवाने रद्द होणार आहेत. तर यापुढे समुदायिक केंद्रात कुर्बानीची सोय असलेल्या ठिकाणी एक किलोमीटरच्या परिसरात कोणत्याही गृहनिर्माण सोसायटीला स्वतंत्र परवानगी देण्यात येणार नाही.