Photo Credit- X

Adarsh School Badlapur Sexual Assault Case: बदलापूर येथे आदर्श शाळेत (Adarsh School)दोन चिमुकल्या मुलींवर करण्यात आलेल्या लैंगिक (Minor Girl Rape)अत्याचाराच्या घटनेनंतर संपूर्ण बदलापूरमध्ये संतापाचा उद्रेक झाला होता. संतप्त नागरिकांना आंदोलनाचे बंड उगारून रेल्वे अडवून धरल्या होत्या. रस्ते बंद केले होते. एसटी बससह खासगी वीहनांची तोडफोड केली होती. काल बदलापूरबंदची हाक देण्यात आली होती. काही आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक देखील केली. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत तब्बल 300 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी लाठीचार करत आंदोलन थांबवलं असले तरीही परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. (हेही वाचा:Badlapur School Case: बदलापूर आदर्श शाळा घटनेची चौकशी करण्यासाठी वरिष्ठ IPS अधिकाऱ्याची नियुक्ती; नराधमांना तात्काळ शिक्षा करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याची फडणवीसांची माहिती )

तसेच या घटनेत आतापर्यंत 28 जणांना अटकही करण्यात आली आहे. , अशा विविध कलमांतर्गत पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. अटक करण्यात आलेल्या आंदोलकांना आज कोर्टात हजर केलं जाणार आहे. त्यांच्यावर कायदा सुव्यवस्था बिघडवल्याप्रकरणी कोणतीही कारवाई होणार का हे पाहावं लागले. (हेही वाचा: Badlapur Adarsh School Sexual Assault Case: 'आरोपीला ताब्यात द्या', मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर बदलापूरकरांचा संताप)

आज देखील कुणी कायदा हातात घेऊन सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड करू नये, असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलंय. काल रात्री उशीरा रेल्वे सेवा पूर्वपदावर आली. दिवसभर नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता. दुसरीकडे बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. सध्या आरोपीची कसून चौकशी केली जात आहे. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देऊ, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलंय.

दरम्यान पोलिसांनी आंदोलक थांबवण्यासाठी आणि आंदोलकांना रेल्वेमार्गावरून बाजूला करण्यासाठी सौम्य लाठीमार केला. पण यानंतर आंदोलक आणखीच आक्रमक झाले. त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्यामुळे आंदोलकांना आवरण्यासाठी मोठ्या संख्येने पोलिसांची कुमक मागवावी लागली. त्यानंतरही जमाव शांत होत नसल्याने अखेर शाळेबाहेर अश्रुधुराचा वापर करावा लागला होता. या घटनेत पोलिसही जखमी झाल्याचे पहायला मिळाले होते.