ठाकरे सरकार मधील राज्यमंत्री बच्चू कडू 'असा' स्वीकारणार आपल्या पदाचा भार
Bachchu Kadu (Photo Credits: Facebook)

महाविकासआघाडी सरकारचं अखेर खातेवाटप काल पार पडलं आहे. बच्चू कडू यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. परंतु, पदभार मात्र ते उद्या स्वीकारणार आहेत. विशेष म्हणजे ते एका हटके स्टाईलने आपल्या मंत्रिपदाचा पदभार स्वीकारणार आहेत. मंत्री बच्चू कडू हे रक्तदान करुन जलसंपदा राज्यमंत्रीपदाचा भार स्वीकारणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेने भाजपशी युती तोडल्यावर, बच्चू कडू यांनी सेनेला पाठिंबा दिला. आणि आता ठाकरे सरकार मध्ये त्यांना राज्यमंत्रीपद देण्यात आलं आहे.

5 डिसेंबरला ठाकरे सरकारच्या मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आलं. बच्चू कडू यांच्या हाती जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार या खात्यांचे राज्यमंत्रिपद देण्यात आले आहे.

आता पदभार स्वीकारताना मात्र आमदार बच्चू कडू हे मंत्रालया समोरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याखाली रक्तदान करुन मंत्रालयात कामकाज सुरु करणार आहेत.

Maharashtra Cabinet Portfolio Allocation: खातेवाटप जाहीर! अजित पवार अर्थमंत्री, अनिल देशमुख गृहमंत्री तर आदित्य ठाकरे यांच्याकडे पर्यटन खात्याची जबाबदारी; पहा संपूर्ण यादी

आता पदभार स्वीकारताना मात्र आमदार बच्चू कडू हे मंत्रालया समोरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याखाली रक्तदान करुन मंत्रालयात कामकाज सुरु करणार आहेत. ते नेहमीच शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढा देत असतात. आणि यावेळी, एका पारधी समाजाच्या सामान्य शेतकऱ्याची फाईल कोणतीही कारवाई न करता प्रलंबित ठेवल्यामुळे संबंधित नायब तहसिलदारांवर थेट निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश बच्चू कडू यांनी दिले आहेत.

दरम्यान, त्यांच्या या निर्णयानंतर महसूल विभागातील काही कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारलं होतं. त्यांच्या मते राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केलेली कारवाई ही एकतर्फी होती.