Bacchu Kadu | (Photo Credit: Facebook)

Bacchu Kadu On Raosaheb Danve:  दिल्लीतील सिंघु बॉर्डरवर गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांकडून फार्म बिलाच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात येत आहे. याच दरम्यान, भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनात चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचे विधान केले होते. त्यावरुन आता राजकरण तापले असून रावसाहेब दानवे यांच्या विधानावर टीका केली जात आहे. तर आता महाराष्ट्र मंत्री बच्चू कडू यांनी दानवे यांच्या विधानावर संताप व्यक्त केला आहे.(Sanjay Raut On Raosaheb Danve: रावासाहेब दानवे यांचे विधान गांभीर्याने घेऊन केंद्र सरकारने चीन, पाकीस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करावा- शिवसेना)

बच्चू कडू यांनी असे म्हटले आहे की, रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांचा अपमान केला आहे. त्यामुळे दानवे यांना घरात घुसून चोपायला हवे असा संताप त्यांनी व्यक्त केला आहे. पुढे त्यांनी असे ही म्हटले की, गेल्या वेळी त्यांनी अशाच पद्धतीचे विधान केले होते. तेव्हा त्यांच्या घराला घेरले होते. मात्र सद्यची परिस्थिती पाहता आम्हाला त्यांच्या घरात घुसावे लागणार आहे.(Farmer's Protest: कृषी विरोधातील शेतकरी आंदोलनात चीन आणि पाकिस्तान चा हात; रावसाहेब दानवे यांचा अजब दावा)

 Tweet:

दरम्यान, केंद्र सरकारने कृषी कायदा हा ट्रेडर्ससाठी असल्याचे मान्य केले आहे. त्यामुळे आता आंदोलक शेतकरी अधिक संतप्त झाले आहे. त्यांना आम्ही 10 डिसेंबर पर्यंत अल्टीमेटम दिला असून पंतप्रधानांनी जर आमचे ऐकले नाही तर आम्ही पुन्हा रेल्वे रुळांवर उतरु असा इशारा शेतकऱ्यांच्या नेत्यांनी दिला आहे. त्याचसोबत शेती हा राज्याचा विषय आहे तर त्यांना याबद्दल कायदा करण्याचा अधिकार नाही असे बलबीर सिंह यांनी म्हटले आहे.