बाबा सिद्दीकी (Baba Siddiqui) यांची हत्या झाल्यानंतर आता पोलिसांकडून मारेकर्यांचा शोध सुरू आहे. या खूनामध्ये लॉरेन्स बिष्णोई याचा समावेश असल्याचा प्राथमिक अंदाज असून त्यानुसार समोर आलेल्या धाग्यादोर्यांवरून पुढील तपास सुरू आहे. वांद्रे पूर्व परिसरामध्ये 12 ऑक्टोबरला दसर्याच्या रात्री बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडण्यात आल्या. या घटनेच्या प्रत्यक्षदर्शीला आता धमकी येत आहे. फोन करून या प्रत्यक्षदर्शीकडे 5 कोटीची मागणी करण्यात आली आहे. यामध्ये पैसे न दिल्यास ठार मारलं जाईल अशी धमकी दिल्याचा दावा आहे. पोलिसांनी यावरून खार पोलिस स्टेशन मध्ये अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
त्याचं नाव सुजीश सुनील सिंह आहे. या प्रकरणात विविध दिशेने तपास सुरू आहे. अभिनेता सलमान खानचा निकटवर्तीय म्हणून बाबा सिद्दीकींना लक्ष्य केल्याचं सांगितलं जात आहे. काही दिवसांपूर्वी सलमान खानला देखील अशाच प्रकारे 5 कोटीच्या खंडणीची धमकी मिळाली आहे. तर झिशान सिद्दीकी देखील निशाण्यावर असल्याचं काही पुराव्यांमध्ये समोर आलं आहे. Actor Salman Khan ला पुन्हा Lawrence Bishnoi च्या नावे धमकी; 'जिवंत रहायचं असेल तर...' Mumbai Police Traffic Control ला मेसेज .
Maharashtra | Baba Siddiqui Murder Case | The police have registered a case against an unknown person at Khar police station in Mumbai as the eyewitness in Baba Siddiqui's murder case received a threatening phone call. The unknown person demanded Rs 5 crores from the eyewitness…
— ANI (@ANI) November 6, 2024
बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झीशान सिद्दीकी च्या म्हणण्यानुसार, त्यांचे वडील गरिबांच्या हक्कासाठी आवाज उठवत होते, त्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली. झीशानने सांगितले की त्याचे वडील रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच काही नरेटीव्ह सेट केले गेले आणि बिष्णोई गॅंगचं नाव सुरू झाले. त्यांनी मुंबई पोलिसांना प्रत्येक बाजूने तपास करण्याचे आवाहन केले आहे.