
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दिकी यांच्यावर शनिवारी रात्री वांद्रे परिसरात गोळीबार करून त्यांची हत्या आली आहे. या प्रकरणी आतापर्यंत दोघांना ताब्यात घेण्यात आले असून या प्रकरणात एका मोठ्या गँगस्टरचा समावेश असल्याचा दावा काही सुत्रांनी केला आहे. दरम्यान अटके केलेले आरोपी पैकी एक जण हरियाणा तर एक जण युपीमधला असल्याचे समजत आहे. बाबा सिद्दिकी यांचे पूत्र झिशान सिद्दीकी (baba siddique Firing) यांच्या कार्यालयाबाहेर साधारण आठ ते साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये बाबा सिद्दिकी यांचा मृत्यू झाला आहे. बाबा सिद्दिकी यांच्या छातीत तीन गोळ्या घुसल्याने ते गंभीररित्या जखमी झाले होते. येथील खेरवाडी जंक्शनजवळ असणाऱ्या सिग्नलवर बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला. (हेही वाचा - Baba Siddique Passes Away: राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांच्यावर अज्ञात व्यक्तींकडून गोळीबार, उपचारादरम्यान मृत्यू)
प्राथमिक माहितीनुसार, तीन व्यक्तींनी बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार केला. हे लोक नक्की कोण होते आणि त्यांनी बाबा सिद्दिकी यांच्यावर का गोळीबार केला, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. दरम्यान पोलीस बिश्नोई गँगच्या अँगलने या प्रकरणाचा तपास करत असल्याचे समोर येत आहे. बाबा सिद्दिकी हे पूर्वी काँग्रेस पक्षात होते. लोकसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार गटात प्रवेश केला होता. बाबा सिद्दिकी हे मुंबईतील नामवंत चेहऱ्यांपैकी एक आहेत. ईदच्या काळातील बाबा सिद्दिकी यांची ईफ्तार पार्टी नेहमी चर्चेचा विषय असते. त्यांच्या इफ्तार पार्टीला बॉलिवूड सेलिब्रिटी आणि बडे राजकारणी हजेरी लावायचे. सलमान आणि शाहरुख खान यांच्यात सलोखा निर्माण करण्याचे काम देखील बाबा सिद्दिकी यांनी केले होते.
बाबा सिद्दिकी यांना 15 दिवसांपूर्वीच जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. यानंतर बाबा सिद्दिकी यांना पोलिसांकडून Y दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. त्यानुसार बाबा सिद्दिकी यांच्यासोबत एक पोलीस कॉन्स्टेबल तैनात असायचा.