रोहा-श्रीवर्धन मतदारसंघाचे माजी आमदार आणि शिवसेना नेते अवधूत तटकरे (Avdhoot Tatkare) यांनी आज (14 ऑक्टोबर) शिवबंधन तोडून भाजपा (BJP) मध्ये प्रवेश केला आहे. मुंबई मध्ये भाजपा प्रदेश कार्यालयामध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) यांच्या प्रमुख उपस्थितीत अवधूत तटकरे यांनी आपल्या समर्थकांसोबत भाजप पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे. नक्की वाचा: Andheri By Election: आता पुन्हा भाजप विरुध्द उध्दव ठाकरे; शिंदे गटाकडून नाही तर भाजपकडून अंधेरी पोटनिवडणुसाठी मुरजी पटेल यांना उमेदवारी जाहिर.

अवधूत तटकरे हे राष्ट्रवादी खासदार सुनील तटकरे यांचे पुतणे आहेत तर अनिल तटकरे यांचे चिरंजीव आहेत. त्यांच्या राजकीय प्रवास एनसीपी पक्षातूनच झाला होता पण आधी एनसीपी आणि नंतर शिवसेना पक्षाला रामराम ठोकल्यानंतर त्यांनी आता भाजपा मध्ये प्रवेश केला आहे. अवधूत यांनी 2014-19 या कालावधी मध्ये श्रीवर्धन मतदारसंघाचे प्रतिनिधित्त्व केले आहे. रोहा नगरपालिकेचे नगराध्यक्षपद देखील सांभाळले आहे. 12 वर्ष ते नगराध्यक्ष होते. 2019 मध्ये आदिती तटकरेंना आमदारकीची उमेदवारी दिल्याने काही काळ राजकारणापासून दूर गेलेले अवधूत शिवसेनेत आले होते. मातोश्री वर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश झाला होता.

आज भाजपा पक्षामध्ये जाहीर प्रवेश केल्यानंतर मीडीयाशी बोलताना त्यांनी कोणताही दबावाखाली हा निर्णय घेतलेला नाही. समर्थकांशी बोलूनच आपण भाजपासोबत जात असल्याचं त्यांनी बोलून दाखवले आहे.