सध्या कोरोना व्हायरसने (CoronaVirus) चीनसह संपूर्ण जगात घातले आहे. या व्हायरसमुळे आतापर्यंत 16 हजाराहून अधिक लोकांनी आपला जीव गमवला आहे. तर, 70 हजाराच्या जवळपास लोकांना याची लागवण झाली आहे. याचाच फटका औरंगाबाद (Aurangabad) येथील पर्यटन व्यवसायिकांनाही (Tourism Business) बसला आहे. एलोरा, अजिंठा, बिबी का मकबरा यांसारख्या पर्यटनस्थळांमुळे औरंगाबाद हे जगभरातील पर्यटकांचे आकर्षण आहे. दरवर्षी हजारो परदेशी पर्यटक औरंगाबाद येथे भेट देतात. मात्र, कोरोना व्हायरसच्या प्रभावामुळे या वर्षी परदेशी पर्यटकांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. एवढेच नव्हेतर, टूर आणि ट्रॅव्हल्स कंपन्यानाही मोठ्या प्रमाणात नुकसानाचा समाना करावा लागत आहे. तसेच 40 टक्के परदेशी सहलींचे बुकिंग रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे.
कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगात भितीजनक वातावरण निर्माण झाले असून मोठ्या संख्येत लोकांनी घराबाहेर पडणे टाळले आहे. याचा फटका अनेक व्यावसायिकांना सहन करावा लागत आहे. नोव्हेंबर ते मार्च महिन्यात ऊन्हाचे प्रमाण कमी असल्यामुळे परदेशी पर्यटक सहलीच्या निमित्ताने औरंगाबाद येथे येत असतात. परंतु, कोरोना व्हायरसच्या प्रभावामुळे यावर्षी पर्यटकांच्या यासंख्येत घट झाली असून 40 टक्के परदेशी पर्यटकांनी आपली बुकींग रद्द केल्याचे समजत आहे. परदेशी पर्यटकांनी पाठ फिरवल्याने पंचतारांकित हॉटेलचा व्यवसाय मंदावला आहे. याशिवाय टूर आणि ट्रॅव्हल्स कंपन्यानाही याचा फटका बसला आहे. हे देखील वाचा- धक्कादायक! चीनमध्ये Coronavirus मुळे तब्बल 1,665 जणांचा मृत्यू; देशात एकूण 68,500 जणांना लागण
भारताचे शेजारी राष्ट्र असलेला चीन सध्या कोरोना व्हायरस संकटाचा सामना करत आहे. केवळ चीनच नव्हेतर, जगभरातील अनेक देशांसमोर या संकटाने आव्हान निर्माण केले आहे. चीनमधील वुहान शहरातून उगम पावलेल्या या कोरोना व्हायरसने आतापर्यंत विविध देशांतील सुमारे 16 हजारहून अधिक नागरिकांचा बळी घेतला आहे. जगभरातील विविध 20 देशांमध्ये या विषाणूचा प्रादुर्भाव वाढला असून, जवळपास 70 हजार लोकांना या रोगाची लागण झाल्याचा आकडा प्रसारमाध्यमांनी दिला आहे.
कोरोना व्हायरस याची लक्षणे म्हणजे प्रामुख्याने सर्दी, तापाची लक्षणे सुरवातीच्या टप्यात दिसतात. त्यानंतर श्वसनामध्ये त्रास जाणवू लागल्याने अनेकांची मृत्यूशी झुंज सुरू आहे. कोरोना विषाणू पहिल्यांदा डिसेंबर 2019 महिन्यात चीनमधील वुहान मध्ये आढळला त्यानंतर तो बिजिंग आणि इतर शहरामध्ये पसरत आहे. 9 जानेवारी दिवशी WHO ने वुहानमध्ये यापूर्वी कोरोना विषाणूच्या अज्ञात प्रकाराने पसरवलेल्या विषाणू मुळे होत असल्याचे स्पष्ट केले आहे. यामध्ये सामान्य सर्दी-पडसे ते सार्स सारख्या गंभीर आजाराची लक्षणे दिसून येत आहेत.