Eknath Shinde | (Photo Credits: Twitter/ANI)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (CM Eknath Shinde) मंत्रिमंडळ बैठकीमध्ये औरंगाबाद (Aurangabad) आणि उस्मानाबादचे (Osmanabad) नामांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण आज महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनात (Maharashtra Monsoon Session) औरंगाबादसह उस्मानाबादच्या नामांतराच्या प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली. या प्रस्तावानुसार औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर (Sambhaji Nagar) तर उस्मानाबादचे नामांतर धाराशिव (Dharashiv) असे करण्याच्या प्रस्तावाला मंजूरी मिळालेली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी याबाबतची घोषणा केली आहे. सोबतच नवी मुंबई विमानतळचं (Navi Mumbai Airport) नामांतर दि बा पाटील (D B Patil) करण्याच्या प्रस्तावाला सुद्धा मंजुरी देण्यात आली आहे. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे.

 

विधान सभेत औरंगाबादसह उस्मानाबादच्या (Aurangabad Osmanabad Renamed) नामांतराच्या प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली असली तरी या नामांतराचा चेंडू आता केंद्राच्या (Central Government) कोर्टात टाकण्यात आला आहे. दोन्ही शहरांची नावं बदलण्याचा प्रस्ताव केंद्रीय गृह मंत्रालयाला (Central Home Ministry) पाठवण्यात येणार आहे. तर नवी मुंबईतील विमानतळाचे (Navi Mumbai Airport) नाव बदलण्याचा प्रस्ताव नागरी उड्डाण मंत्रालयाला पाठवला जाईल. तरी केंद्रातही भाजपची सत्ता असल्याने या दोन्ही निर्णयांवर शिक्कामोर्तब होण्यावर जराही शंका नाही, असं म्हणणं चुकीच ठरणार नाही.

 

तरी शिंदे फडणवीस सरकारच्या औरंगाबाद (Aurangabad) आणि उस्मानाबाद(Osmanabad) नामांतराच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court)  याचिका दाखल करण्यात आली आहे. औरंगाबाद-उस्मानाबादच्या नामांतरविरोधी याचिकेत राज्य शासनाने घेतलेला नामांतर निर्णय हा फक्त राजकीय हेतूने घेतलेला निर्णय आहे व केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वाच्या विरोधात आहे, असे नमूद करण्यात आले आहे. औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी शिंदे सरकारचा हा निर्णय अमान्य असल्याची प्रतिक्रीया दिली होती.