औरंगाबाद येथे आणखी कोरोनाचे 74 रुग्ण आढळून आल्याने आकडा 12 हजार 421 वर पोहचला
Coronavirus Outbreak (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता अधिकच वाढत असल्याने नागरिकांना सुद्धा काळजी घेण्याचे सातत्याने आवाहन करण्यात येत आहे. राज्यातील मुंबई, ठाणे,नवी मुंबई आणि पुणे हे कोरोनाचे मुख्य हॉटस्पॉट ठरले आहेत. त्यात आता औरंगाबाद येथे ही कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असून आणखी 74 जणांचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे औरंगाबाद येथे कोरोनाबाधितांचा आकडा 12 हजार 421 वर पोहचला आहे.(मुंबई: मध्य रेल्वेकडून COVID19 चा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून CheckIn Master नावाचे App लॉन्च, प्रवाशांच्या तिकिटांची तपासणी केली जाणार)

औरंगाबाद येथे कोरोनाबाधितांचा आकडा 12 हजारांच्या पार गेला आहे. त्यापैकी 7178 रुग्णांची प्रकृती सुधारली असून 426 जणांचा बळी गेला आहे. तसेच 4817 जणांवर अद्याप उपचार सुरु असल्याची माहिती देण्यात आली आहे. कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच कोरोनाच्या हॉटस्पॉट ठिकाणी लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले आहेत.(मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यंदा वाढदिवस साजरा करणार नाहीत, कार्यकर्त्यांनी रक्तदान, प्लाझ्मा दान सारख्या शिबिरांचे आयोजन करण्याचे आवाहन)

दरम्यान,महाराष्ट्रात काल दिवसभारात 9895 नवे कोरोना व्हायरस  संक्रमित रुग्ण आढळून आले. तर 298 संक्रमितांचा मृत्यू झाला. राज्यातील एकूण कोरोना व्हायरस  संक्रमितांची संख्या 3,47,502 इतकी झाली आहे. यात रुग्णालयात प्रत्यक्ष उपचार सुरु असलेल्या 1,36,980 रुग्णसंखेचाही समावेश आहे. तसेच, उपचार घेऊन प्रकृती सुधारल्याने आणि बरे वाटू लागल्याने रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेले 1,94,253 जण आणि आतापर्यंत मृत्यू झालेल्या 12,854 रुग्णांचाही समावेश आहे.