मुंबईत (Mumbai) महिलांचा सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर व्हायला लागला आहे. मुंबईत आपल्या भावाकडे राहायला आलेल्या मुलीवर चार अज्ञात व्यक्तींनी बलात्कार केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. पीडित तरुणी ही एचआयव्ही (HIV) ग्रस्त असून तिची प्रकृती अधिकच बिघडल्याने तिला औरंगाबादला नेऊन रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे उपचारादरम्यान तिच्यावर बलात्कार झाल्याचे निर्दशनास आले. (धक्कादायक! मार्कांची स्पर्धा भोवली, चुलत भावाने शिक्षकासोबत मिळून बहिणीवर केला सामूहिक बलात्कार)
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मूळची जालनाची असलेली ही पीडिता मुंबईत आपल्या भावाकडे राहिला आली होती. मात्र तिची प्रकृती अधिकच गंभीर झाल्याने भावाने गावी आई-वडीलांना कळवले. त्यानंतर आई-वडीलांनी तिला गावी परत नेत औरंगाबाद येथे रुग्णालयात दाखल केले. (मुंबई: कफ परेड येथे 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, आरोपी फरार)
बलात्कार झाल्याचे निर्दशनास आल्यानंतर पोलिसांना दिलेल्या माहितीत पीडितेने सांगितले की, मुंबई राहत असताना पीडित तरुणी मैत्रिणीकडे बर्थडे पार्टीला गेली होती. त्यावेळेस चारजणांनी तिच्यावर बलात्कार केला. मात्र तिची प्रकृती फारच गंभीर असल्याने ती आरोपींना ओळखू शकत नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. (विवाहित महिलेवर पाच जणांकडून सामूहिक बलात्कार, व्हिडिओ सोशल मीडियात केला व्हायरल)
हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर मुंबईत गुन्हा घडला असल्याने पीडित मुलीच्या वडीलांनी बेगमपुरा पोलिसांनी झीरो एफआयआर नोंदवून मुंबईतील चुनाभट्टी पोलीस स्थानकात एफआयआर वर्ग केला. या प्रकरणी पोलिसांनी चार अज्ञात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरु आहे.