औरंगाबाद कोविड सेंटर। Photo Credits: Twitter/ ANI

औरंगाबाद (Aurangabad) मध्ये पदमपुरा (Padampura) भागात असलेल्या कोविड सेंटर मधील डॉक्टरने महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्यानंतर सर्वत्र गहजब पसरला होता. मात्र या प्रकरणी आता डॉक्टरला निलंबित करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. काल अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये देखील या प्रकरणाची चर्चा झाली. त्यानंतर कोविड सेंटर मध्ये सीसीटीव्ही फूटेज तपासण्यात आले. त्यामध्ये विनयभंगासारखे कोणतेही चित्र दिसले नाही. मात्र ते दोघे बोलताना आढळले अशी माहिती पालिका रूग्णालयाच्या मेडिकल ऑफिसरकडून देण्यात आली आहे.

दरम्यान मीडिया रिपोर्ट्सनुसार, डॉक्टर आणि तक्रारदार महिलेचा पती हे दोघे मित्र आहेत. त्यामुळे हा प्रकार काही वेगळा देखील असू शकतो असे अंदाज मांडले जात आहेत. Corona Center Aurangabad: डॉक्टरची महिलेकडे शरीसुखाची मागणी, औरंगाबाद येथील कोविड सेंटरमधील घटना.

 

ANI TWEET

कोविड सेंटर मध्ये महिलेसोबत झालेल्या या असभ्य वर्तनाच्या वृत्तमुळे डॉक्टरला तात्काळ कामापासून दूर करण्यात आले होते. तसेच महिलेच्या कुटुंबीय आणि नातेवाईकांना हा प्रकार समजल्यानंतर त्यांनी रुग्णालयात घुसुन डॉक्टरला बेदम मारहाण केली.