इंजक्शन घेऊन डॉक्टरने संपवलं आयुष्य; औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयातील घटना
Injection | Representational Image | (Photo Credits: stux/Pixabay)

एका डॉक्टरच्या धक्कादायक मृत्यूमुळे औरंगाबाद शहर हादरुन गेले आहे. औरंगाबाद (Aurangabad) शहरातील घाटी रुग्णालय (Ghati Hospital) येथे घटना घडली. या रुग्णालयात एका डॉक्टरने इजंक्शन (Injection) घेऊन आपलं आयुष्य संपवलं आहे. शशात्री गौडा असे या डॉक्टरचे नाव असल्याची प्राथमिक माहिती आहे. तो केवळ 27 वर्षे वयाचा होता. या डॉक्टरनं आपलं आयुष्य नेमकं कोणत्या कारणाने संपवले याबाबत माहिती पुढे आली नाही. तसेच, ही हत्या आहे की आत्महत्या याबाबतही माहिती मिळू शकली नाही. या घटनेमुळे अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत.

दरम्यान, डॉ. शशात्री गौडा यांचं शिक्षण पूर्ण झाल्यांतर त्यांनी घाटी रुग्णालय येथेच सहाय्यक प्राध्यापक म्हणूनही काम सुरु केले होते. सर्वांशी हसत खेळत वावरणारे उमदं व्यक्तिमत्त्वाबाबत अचानक अशी धक्कादायक बातमी आल्याने सगळेच गोंधळून गेले आहेत. (हेही वाचा, औरंगाबाद: दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या म्हणून तरुणाला तलवारीने भोकसले)

दरम्यान, डॉ. शशात्री गौडा यांनी आपलं आयुष्य का संपवलं हा प्रश्न अद्याप तरी अनुत्तरीत आहे. घटनेची माहिती पोलिसांना मिळाली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.