Mumbai: मुंबईमध्ये आंतरजातीय विवाह (Inter-Caste Marriage) करणाऱ्या मुलीची वडिलांनी हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वर्सोवा (Versova) पोलिसांनी 79 वर्षीय व्यक्तीला पत्नी आणि मुलीवर हातोडा आणि चाकूने हल्ला केल्याप्रकरणी अटक केली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपी आपल्या मुलीच्या लग्नामुळे नाराज होता. त्याच्या विरोधानंतरही साखरपुडा समारंभ केल्याने तो नाराज झाला.
आरोपीचे नाव प्रभाकर काड्या शेट्टी, असं असून ते निवृत्त डॉक्टर आहेत. तो पत्नी गीता (वय, 48) आणि मुलगी प्रणिता (वय, 38) यांच्यासोबत चेतना बिल्डिंग, सात रास्ता, अंधेरी (पश्चिम) येथे राहतो. शेट्टी यांनी आपल्या मुलीच्या लग्नाच्या प्लॅनवर आक्षेप घेतला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 एप्रिल रोजी प्रणिताच्या नियोजित लग्नाला शेट्टी यांनी आक्षेप घेतला होता. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, शेट्टीची पत्नी आणि मुलीसोबत लग्नावरून वारंवार भांडणे होत होती आणि त्याच्या कुटुंबीयांनी लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेवर शेट्टीचे नाव दिले नव्हते. (हेही वाचा - Building Collapsed in Bhiwandi: भिवंडी मध्ये कोसळली इमारत; 10 जण दबल्याची भीती (Watch Video))
दरम्यान, पहाटे 3.30 वाजता गीता त्यांच्या बेडरूममध्ये झोपलेली असताना शेट्टीने तिच्या डोक्यावर हातोड्याने वार केले. त्यानंतर त्याने दोरीचा वापर करून तिचा गळा दाबण्यास सुरुवात केली. त्याने तिच्या मानेवर आणि छातीवर चाकूने वार केले. या आवाजाने हॉलमध्ये झोपलेली प्रणिता आवाजाने जागी झाली. ती बेडरूममध्ये गेली आणि शेट्टीने तिच्यावर चाकूने हल्ला केला.
दरम्यान, जखमी झालेल्या पत्नीने आणि मुलीने शेवटी शेट्टी यांचे हात बांधले. त्यांनी हल्ल्याबद्दल शेजाऱ्यांना सांगितल्यानंतर अखेरीस आरोपीला भारतीय दंड संहितेच्या कलम 307 (हत्येचा प्रयत्न) अंतर्गत अटक करण्यात आली. तसेच आरोपीच्या जखमी पत्नी आणि मुलीला कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले.