Rahul Narvekar (PC - ANI)

शिवसेना आमदार अपात्रता (MLA Disqualification) प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) ताशेरे ओढत घालून दिलेल्या मर्यादेमुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांची चांगलीच धावपळ उडाली आहे. हे प्रकरण येत्या 31 डिसेंबर 2023 पर्यंत निकाली काढायचे आहे. एका बाजूला दिवाळी दुसऱ्या बाजूला नागपूर येथे होणारे राज्य विधिमंडळ अधिवेशन या सर्वांमधून वेळ काढत अध्यक्षांना या प्रकरणाची सुनावणी करावी लागणार आहे. त्यामुळे सर्व बाबींचा विचार करुनच त्यांना तारेवरची कसरत करत वेळापत्रक ठरवावे लागणार आहे. परिणामी नार्वेकर यांना ऐन दिवाळीत 'कर्तव्यपालन' करत 'रुखा हुआ फैसला' निकाली काढवा लागणार आहे.

राहुल नार्वेकर यांना सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी दिलेल्या निर्णयानुसार, शिवसेनेच्या 16 आममदारांच्या अपात्रतेसंदर्भात प्रथम निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यासाठी त्यांना आता स्वतंत्र वेळापत्रक तयार करावे लागणार आहे. कारण त्यांनी सुप्रिम कोर्टाकडे दोन वेळा सादर केलेले वेळापत्र फेटाळले गेले आहे. त्यामुळेच कोर्टाने त्यांना विशिष्ट मुदतीत हा निर्णय घेण्यासाठी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेली वेळ विचारात घेता विधानसभा अध्यक्ष कामाला लागले असून त्यांनी वेळापत्रक बनविण्यास सुरुवात केल्याचे समजते.

दरम्यान, राहुल नार्वेकर यांना केवळ शिवसेना आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातच निर्य घ्यायचा नाही. तर, त्यांना तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाील आमदारांबाबतही घ्यायचा आहे. सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही प्रकरमामध्ये एकत्रच आदेश दिले आहेत. फक्त उसंत इतकीच की, शिवसेना आमदारांच्या अपात्रतेबद्दलचा निर्णय त्यांना 31 डिसेंबर 2023 पर्यंत द्यावा लागणार आहे. तर, एनसीपी आमदरांच्या अपात्रतेसंदर्भात त्यांना पुढच्या वर्षी म्हणजे 31 जानेवारी 2025 पर्यंत निर्णय घ्यायचा आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या सुनावणीसाठी त्यांच्याकडे पुरेसा वेळ आहे, असे मानले जात आहे.

दरम्यान, विधानपरीषदेचे विरोधी पक्षनेते आणि शिवसेना (UBT) गटाचे नेते अंबादास दानवे हे विधानसभा अध्यक्षांची भेट उद्या घेणार असल्याचे समजते. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशासंदर्भात ही भेट होणार असल्याचे समजते. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची प्रत अद्याप आपल्याला मिळाली नसल्याचे वक्तव्य प्रसारमाध्यमांशी बोलताना विधानसभा अध्यक्षांनी केले होते. त्यावर उद्धव ठाकरे यांनी एक पत्रकार परिषद घेत त्यांना प्रत मिळाली नसेल तर ती आम्ही देतो, असे म्हटले होते. या पार्श्वभूमीवर नार्वेकर आणि आंबादास दानवे यांच्यात भेट होणार असल्याचे समजते.दरम्यान, दिवळी, अधिवेशन आणि सुनावणी यातून नार्वेकर कसा मार्ग काढतात याबाबत उत्सुकता आहे.