Raj Thackeray On Assembly Elections Results: 4 राज्यांच्या निवडणुकीवर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “लोकसभेला माझा ताशा वाजेल”
Raj Thackeray | Twitter

मध्य प्रदेश (Madhya Pradesh), छत्तीसगड (Chhattisgarh) आणि राजस्थानच्या (Rajasthan) विधानसभा निवडणुकांचे निकाल भाजपच्या बाजूने जाताना दिसत असून या निवडणुकीत तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत (Assembly elections) भाजपला (BJP) मोठ्या मताधिक्याने विजय मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी 4 राज्यांच्या निवडणूक निकालांवर प्रतिक्रिया दिली आहे. 'चार-पाच राज्याचा निकाल आला आहे. पुढच्या वर्षी लोकसभा लागणार आहे, तेव्हा माझा ताशा वाजणार आहे. त्यावेळी कानठळ्या बसणार आहे.  (हेही वाचा -Devendra Fadanvis On BJP Win: 'महाराष्ट्रातही भाजपच येणार', चार राज्यांच्या निकालांनंतर देवेंद्र फडणवीसांचा विश्वास)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मुंबईतील काळाचौकी येथे कोकण महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवाकरता राज ठाकरे  काळाचौकीत गेले होते. यावेळी त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकांबाबतही भाष्य केलं. राज ठाकरे म्हणाले, चार-पाच राज्यांचे आजच निकाल आपल्यापर्यंत आलेले आहेत. पुढच्या वर्षी लोकसभेच्या निवडणुका होतील, या ढोल ताशांपेक्षा जास्त ताशा माझा वाजला जाईल.

राज ठाकरे पुढे म्हणाले, 'मी लहानपणापासून इथे अनेकदा यायचो. आज सुद्धा मटणाचा सुगंध आला. असले जत्रोत्सव हे मराठी माणसाचं अस्तित्व आहे. बाहेरून कितीही आले तरीही तुमचं रक्त मराठी भागात असेच सळसळते राहिले पाहिजे'. 'तुम्ही मालक आहात आणि बाकीचे आलेले भाडेकरू आहेत हे लक्षात ठेवा. तुमचा हक्क घालवू नका. अभिमानाने ताठ मानेने येथे राहिले पाहिजे. तुमच्या तक्रारी तिथून झाल्या पाहिजेत की आम्हाला त्रास देतात.