BJP Candidate Pankaja Munde vs NCP Candidate Dhananjay Munde | (Photo Credit: Archived, edited, representative images)

Parli Assembly Constituency Election Results 2019: परळी विधानसभा (Parli Assembly Constituency) मतदारसंघात आज आनंद, उत्साह, ईर्ष्या, अशा सर्व भावभावनांचे मिश्रण पाहायला मिळत आहे. परळी विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार पंकजा मुंडे (Pankaja Munde) विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) असा थेट सामना पाहायल मिळत आहे. तसे पाहता ही पारंपरीक लढत आहे. दोन्ही उमेदवारांनी केलेल्या निवडणूक प्रचारावरुन चित्र आहे की, सामना अटीतटीचा आहे.

महत्त्वाचे म्हणजे पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतल्या होत्या. तर, धनंजय मुंडे यांच्यासाठी शरद पवार यांनी सभा घेतली होती. परंतू, त्या तुलनेत धनंजय मुंडे हे एकटेच किल्ला लढवत होते. जाणून घ्या धनंजय मुंडे विरुद्ध पंकजा मुंडे या संघर्षात कोण घेतंय आघाडी. (विधानसभा निवडणुकीचे ताजे अपडेट्स घ्या जाणून)

आज सकाळी आठ वाजलेपासून प्रत्यक्ष मतमोजणीस सुरुवात झाली आहे. राज्यभरातील 288 मतदारसंघासाठी ही मतमोजणी होत आहे. सुरुवातीला पोस्टल मतांची मोजणी होणार आहे. त्यानंतर विविध मतदान केंद्रांवरील मतदानाची मोजणी पार पडत आहे. सर्वांनाच परळी विधानसभा मतदारसंघातील निकालाबाबत उत्सुकता आहे. लवकरच ही आकडेवारी आपल्या हाती येईल.

परळी विधानसभा मतदारसंघात पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे अशी पारंपरीक लढत पाहायला मिळते. हा सामना या आधीही अत्यंत चुरशीचा झाला आहे. या वेळीही या निवडणुकीत अत्यंत काट्याची टक्कर पहायला मिळते. महत्त्वाचे म्हणजे मतदानाच्या दिवसाच्या दोन दिवस आगोदर या मतदारसंघात धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर केलेल्या टीकेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओवरुन अत्यंत वाद निर्माण झाला होता. या व्हिडिओनंतर पंकजा मुंडे यांना आलेली कथीत भोवळ आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांनी भावांनी आमच्या बहिण भावाच्या नात्यात विष कालवले. व्हिडिओ पाहून जगण्याचीच इच्छा राहिली नाही, असे काढलेले भावनिक उद्गार कमालीचे महत्त्वाचे ठरले. या पार्श्वभूमिवर परळीची जनता कोणाला संधी देते याबाबत उत्सुकता आहे.