Palghar: कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस भरतीची (Police Bharti) तयारी करत असलेल्या एका 20 वर्षीय तरुणीवर अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने हल्ला केला. पूनम भामटे असे या मुलीचे नाव असून अज्ञात व्यक्तीने केलेल्या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी तरुणीवर हल्ला करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध कासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डहाणू तालुक्यातील कासा गावातील डोंगरीपाडा येथील पूनम भामटे या नेहमीप्रमाणे पोलीस भरतीसाठी खासगी अकादमीत जात असताना अज्ञात व्यक्तीने तिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. अज्ञात व्यक्तीने मुलीच्या डोक्यावर, गालावर आणि पाठीवर वार केले. यात मुलगी गंभीर जखमी झाली. (हेही वाचा - Mumbai Metro Woman Dragged Video: ड्रेस अडकल्याने मुंबई मेट्रो सोबत फरफटली महिला, Chakala Station वरील व्हिडिओ व्हायरल)
यानंतर मुलीला तातडीने कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर मुलीला सिल्वासा येथील वेदांत रुग्णालयात दाखल करण्यात आले. (हेही वाचा - MBVV Police: महिलेसह चार मुलांची हत्या, प्रकरणाला 28 वर्षांनी फुटली वाचा, आरोपीला अटक)
अज्ञात व्यक्तीच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेली मुलगी बोलण्याच्या मनस्थितीत नसल्याने पोलिसांनी तिच्या कुटुंबीयांचे जबाब नोंदवून कासा पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असल्याचे सांगण्यात येत आहे.