मुंबई मेट्रोदरम्यान प्रवास करताना ड्रेस मेट्रोच्या दरवाजात अडकल्याने एक महिला फलाटावरच मेट्रोसोबत फरफटत गेली. ही घटना घाटकोपर वर्सोवा मार्गादरम्यान असलेल्या चकाला मेट्रो स्टेशनवर सायंकाळी 4.10 वाजता घडली. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आपणही हा व्हिडिओ येथे पाहू शकता. घडल्या घटनेमुळे प्रवाशांमध्ये काही काळ घबराटीचे वातावरणहोते. दरम्यान, या घटनेत महिला बचावली मात्र तिला दुखापत झाली आहे. महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर घडला प्रकार पुढे आला.
Clip shows woman being dragged till end of platform after her dress gets stuck in #Mumbai Metro train’s door
Read the story here: https://t.co/7hpPv6hoMb pic.twitter.com/tx305M5OzQ
— Express Mumbai (@ie_mumbai) December 30, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)