सांगली: हिंगणगाव खुर्द गावातील एका अवलियाने आईलाच देवी मानून घराशेजारी बांधले आपल्या माऊलीचे बांधले मंदिर, नवरात्रोत्सवात मंदिरात होते विशेष पूजा
Temple Representative Image (Photo Credits: PixaBay)

आईसारखे दैवत सा-या जगतावर नाही, हे केवळ काव्यात न वापरता त्याची प्रत्यक्ष प्रचिती दिसेल तुम्हा कडेगाव तालुक्यातील हिंगणगाव  खुर्द (Hingangaon Khurd) गावात. कारण येथील एका अवलियाने आपल्या आईलाच देवी मानून तिचे मंदिर आपल्या घराशेजारी बांधले आहे. ABP माझा ने केलेल्या रिपोर्टनुसार, सांगलीतील (Sangli) कडेगाव तालुक्यातील हिंगणगाव खुर्द गावात एका अवलियाने आपल्या आईचे मंदिर बांधले आहे. अशोक वायदंडे असे त्यांचे नाव आहे. विशेष नवरात्रोत्सवात या मंदिरात विशेष पूजा अर्चा देखील केली जाते.

हिंगणगाव खुर्द येथील अशोक वायदंडे यांचे त्यांच्या आईवर प्रचंड प्रेम होते. आपल्या घरासाठी, कुटूंबासाठी आपल्या आईने केलेले कष्ट पाहून त्यांनी आपल्या आईलाच देवी मानले होते. अशा या देवीस्वरूप आईचेच मंदिर बांधण्याचा त्यांनी निश्चय केला आहे आणि ती कल्पना सत्यात उतरवली.

हेदेखील वाचा- Navratri 2020 Simple Mehndi Design: नवरात्री उत्सवासाठी हातावर काढा 'या' सुरेख मेहंदी डिझाईन; पहा व्हिडिओ

ABP माझाला ला दिलेल्या मुलाखतीत अशोक वायदंडे यांनी सांगितले आहे की, "आईसाठी नवरात्रोत्सव म्हणजे आराधनेचा काळ होता. 4 ऑक्टोबर 2000 रोजी नवरात्र उत्सवाच्या सातव्या दिवशी त्यांच्या आई हारुबाईंनी पूजा व आरती केली आणि मला जाण्याची वेळ आली. मला जावे लागेल, मी जाणार असे सांगितले आणि त्यांचे निधन झाले.' त्यानंतर अशोक यांनी मुंबईला येऊन सुरक्षा रक्षकाची नोकरी केली आणि त्यात चांगले यश मिळवले. 2011 मध्ये त्यांनी कळंबोली येथे आणि त्यानंतर 2015 मध्ये हिंगणगाव येथेही आपल्या आईचे मंदिर बांधले. आईच्या आशीर्वादामुळे हे सारे शक्य झाले असा त्यांचा विश्वास होता.

तेव्हापासून प्रत्येक नवरात्रीत या मंदिरात विशेष पूजा केली जाते. आपली आई या मंदिराच्या रुपात कायम आपल्यासोबत आहे आणि देवीप्रमाणे तिचे कृपाशिर्वाद आपल्या पाठीशी आहेत असा त्यांचा विश्वास आहे.