Representational Image (Photo Credits: PTI)

पंढरपूरची आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. यामध्ये वैष्णवांचा मेळा पायी दिंडी, पालख्यांच्या माध्यमातून पंढरपूर कडे निघाला आहे. यंदा कोरोना संकटानंतर 2 वर्षांनी पुन्हा वारकरी मोठ्या उत्साहात विठ्ठल रूक्मिणीच्या दर्शनासाठी येण्याकरिता सज्ज आहे. मग आता वारकरांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे देखील सज्ज झाली आहे. मध्य रेल्वेकडून आषाढी वारी साठी विशेष गाड्या सोडल्या जाणार आहेत.

मध्य रेल्वे आषाढी वारीसाठी लातूर-पंढरपूर ही विशेष गाडी सोडणार आहे. त्यांची ही गाडी 5,6,8,11,12 आणि 13 जुलै रोजी लातूर रेल्वे स्थानकावरून सकाळी साडे सात वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 12 वाजून 25 मिनिटांनी पंढरपूरला पोहोचणार आहे. यंदा आषाढी एकादशी चा सोहळा 10 जुलै दिवशी आहे.

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरात पोहचण्यासाठी जशी विशेष सोय आहे तसेच परतीच्या प्रवासाची देखील सोय करण्यात आली आहे. परतीच्या प्रवासात ही गाडी याच दिवशी पंढरपूर इथून दुपारी 2 वाजून 32 मिनिटांनी सुटेल आणि लातूरला त्याच दिवशी संध्याकाळी सात वाजून 20 मिनिटांनी पोहोचणार आहे. हे देखील नक्की वाचा: Ashadhi Wari Sant Tukaram Palkhi 2022: संत तुकाराम महाराजांची पालखी 20 जूनला ठेवणार प्रस्थान; पहा गोल रिंगण, उभं रिंगणाच्या तारखा.

दरम्यान आषाढी वारीसाठी यंदा लाखो वारकरी पायी पंढरपूरकडे निघाले आहेत. या प्रवासात प्रशासनाकडून ठिकठिकाणी विशेष सोय केली जात आहे. त्यांच्या आरोग्याची देखील काळजी घेतली जाणार आहे.