पंढरपूरच्या (Pandharpur विठ्ठल रखुमाई (Vitthal-Rakhumai Temple) मुर्तीसाठी दोन सुवर्ण मुकूट अर्पण करण्यात येत आहेत. नांदेड जिल्ह्यात येणाऱ्या उमरी येथील माजी नगराध्यक्ष आर्यवैश्य समाजसेवक विजयकुमार पंढरीनाथ उत्तरवार हे मुकूट अर्पण करणार आहेत. हे मुकूट अर्पण करण्याबद्दल उत्रवार यांनी संकल्प केला होता. तो संकल्प येत्या आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi 2022) दिवशी म्हणजेच 10 जुलै रोजी पूर्णत्वास जातो आहे. सुमारे 1968 ग्रॅम शुद्ध सोन्यापासून या मुकूटांची निर्मीती करण्यात आली आहे. सुमारे 1 कोटी 3 लाख रुपये इतकी या मुकुटांची किंमत आहे.
विठ्ठल-रखुमाईला हे मुकूट अर्पण करत असताना सराफा व्यापारी पंढरीनाथ उत्तरवार सरफा यांच्यासोबत विजयकुमार व जयश्री उत्तरवार समवेत त्यांचे सुपुत्र ओमकार,अरविंद,अजय, अच्य्युत,व डॉ.अनंत उत्तरवार आदी मंडळी उपस्थित असणार आहेत. (हेही वाचा, Ashadhi Ekadashi 2022 Images: आषाढी एकादशीच्या Messages Facebook, WhatsApp च्या माध्यमातून द्या मंगलमय शुभेच्छा)
View this post on Instagram
दरम्यान, विविध तिर्थस्थानांना आणि मंदिरांना मोठमोठ्या देणग्या, भेट देण्याची परंपरा फार जुनी आहे. आजही बालाजी, शिर्डी साईबाबा, पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती, मुबईतील सिद्धीविनायक, पंढरपूर विठोबा अशा देवस्थानांना मोठ्या प्रमाणावर देणगी, भेट दिली जाते.