Pandharpur Vitthal Mandir Manache Varkari 2019: महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात दरवर्षी आषाढी एकादशीला भक्तांची गर्दी असते. वारकरी पंथीय भाविक वारी करत, चालत विठ्ठल-रूक्मिणीचं दर्शन घेण्यासाठी पंढरपूरात दाखल होतात. आषाढीला दरवर्षी विठ्ठल मंदिरामध्ये शासकीय पूजेचा मान मुख्यमंत्र्यांना दिला जातो. त्याप्रमाणे यंदाही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अमृता फडणवीस(Amruta Fadnavis) यांनी महापूजा केली. त्यांच्यासोबत दर्शनाच्या रांगेतील सामान्य दांम्पत्यासोबत विठ्ठलाची पूजा करण्याचा मान मिळतो. यंदा हा मान विठ्ठल चव्हाण (Vitthal Chavan) दांम्पत्याला मिळाला. आषाढी एकादशी 2019 साठी पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरावर आकर्षक रोषणाई
आषाढी एकादशी 2019 चे मानाचे वारकरी कोण ?
आषाढी एकादशी 2019 चे मानाचे वारकरी सौ. प्रयाग आणि विठ्ठल मारुती चव्हाण ठरले. मुख्यमंत्र्यांसोबत त्यांना महापूजेचा मान मिळाला. चव्हाण दाम्पत्य हे सांगवी सुनेवाडी तांडा, तालुका अहमदपूर (लातूर) चे रहिवासी असून श्री. चव्हाण हे सांगवी सुनेवाडी तांड्याचे 10 वर्षे सरपंच होते. मागील 39 वर्षांपासून ते सलग वारी करत आहेत. आषाढी एकादशीच्या शुभेच्छा HD Images,Wallpapers च्या माध्यमातून देऊन मंगलमय करा विठू माऊलीच्या भक्तांचा आजचा दिवस!
#आषाढीएकादशी मानाचे वारकरी सौ. प्रयाग आणि श्री.विठ्ठल मारुती चव्हाण यांना मिळाला महापूजेचा मान. चव्हाण दाम्पत्य हे सांगवी सुनेवाडी तांडा,ता.अहमदपूर (लातूर) चे रहिवासी असून श्री. चव्हाण हे सांगवी सुनेवाडी तांड्याचे १० वर्षे सरपंच होते. गेल्या ३९ वर्षांपासून सुरू आहे सलग वारी. pic.twitter.com/IzL7kGrly8
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 12, 2019
आज पहाटे अमृता आणि देवेंद्र फडणवीस मंदिरामध्ये पोहचले. परंपरेनुसार विधीवत विठ्ठल रूक्मिणीची पूजा केली. त्यानंतर मानाचे वारकरी चव्हाण दांम्पत्यांचाही त्यांना गौरव केला.