
अंधश्रद्धा (Superstition) आणि जादूटोणा (Black Magic) यांसारख्या अघोरी कृत्याबाबत देशभरात जनजागृती होत असताना देखील अजूनही अनेक जिल्ह्यात हा प्रकार सर्रासपणे सुरु आहे. त्यात या काळ्या जादूपायी लोकांकडून बक्कळ पैसे उकळण्याचे काम देखील सुरु आहे. असाच काही प्रकार पुण्यात घडला आहे. येथे एका आजारी व्यक्तीवर त्याच्या घटस्फोटित पत्नीने जादूटोणा केल्याचे सांगून त्याच्याकडून 4 कबुतरांच्या (Pigeon) बदल्यात 6 लाख रुपये उकळल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी दोन भोंदूबाबांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध कोंढवा पोलिस (Kondhva Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ABP माझा ने दिलेल्या वृत्तानुसार, कुतुबुद्दीन नजमी आणि हकिमुद्दीनराज मालेगावंवाला अशी या आरोपींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अबिझर यांचा भाऊ हुझेफा याचे 2010 मध्ये गुजरात मधील मुलीसोबत लग्न झाले होते. त्यानंतर मुलं होत नाही म्हणून या दोघांनाही सामंजस्याने 2017 मध्ये घटस्फोट घेतला. त्यानंतर मागील 4 महिन्यांपासून त्यांचा भाऊ प्रचंड आजारी होता. त्यावर अनेक उपचार करुनही प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांचे कुटूंबिय धर्मगुरु सय्यदना सैफुदीन यांना मुलाची तब्येत ठिक होण्याकरता अल्लाकडे प्रार्थना करण्याची विनंती करण्याबाबत अर्ज देण्यास गेले होते. त्यावेळी त्यांना हकिमउद्दीन मालेगाववाला भेटला.हेदेखील वाचा- Rape on Pretext of Marriage: लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार; टीव्ही अभिनेत्रीचा वैमानिकावर आरोप, ओशिवारा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
त्यानंतर तो कुतुबुद्दीन ला घेऊन हुझेफाच्या घरी त्याला पाहायला गेला. आणि घडलेला प्रकार ऐकल्यानंतर त्यांच्या बायकोने त्याच्यावर जादूटोणा केल्याचे सांगितले. या त्रासापासून मुक्तता होण्यासाठी या जादूटोण्याचा इलाज करण्याकरता मुंबईत सैफी, महेल येथे जाऊन महागडी कबुतरे खरेदी करावी लागतील. ती कबुतरे काळी जादूची बला त्यांचे अंगावर घेतात, त्यामुळे आपल्याला त्रास होत नाही असे सांगत चार कबुतरे खरेदी करण्यास सहा लाख 80 हजार रुपये मागितले. त्यामुळे हुझेफाचे वडिलांनी बॅंक खात्यातून पैसे काढून दिले.
मात्र तरीही त्याच्या तब्येतीत सुधारणा न झाल्याने फिर्यादीने कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या आरोपींवर जादूटोणा प्रतिबंधात्मक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.