Aryan Khan Drugs Case: 25 कोटी खंडणीचा आरोप NCB ने फेटाळला; Press Note जारी करत केला खुलासा
एनसीबी (Photo Credits: Twitter)

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून आर्यन खान ड्रग्स प्रकरण (Aryan Khan Drugs Case) गाजत आहे. यावरुन एनसीबीचे डिरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नबाव मलिक (Nawab Malik) यांच्याकडून जोरदार टीका होत आहे. यातच आता प्रभाकर साईल (Prabhakar Sail) यांनी आर्यन खानच्या सुटकेसाठी समीर वानखेडे यांनी 25 कोटी रुपये मागितल्याचा आरोप केला आहे. यावर आता एनसीबी (NCB) कडून प्रेस नोट (Press Note) जारी करुन खुलासा करण्यात आला आहे.

एनसीबीने आपल्या प्रेसनोट मध्ये म्हटले की, "2 ऑक्टोबर रोजी झालेल्या क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरणासंदर्भात प्रभाकर साईल यांनी एक अॅफिटेव्हीट दाखल केले आहे. याची माहिती मला सोशल मीडियाद्वारे मिळाली. सध्या ही केस कोर्टासमोर उभी असल्याकारणाने प्रभाकर सेल यांनी सोशल मीडिया ऐवजी प्रत्यक्ष कोर्टात उभे राहून आपले म्हणणे मांडावे. तसंच या अॅफिटेव्हीट मध्ये प्रभाकर यांनी ऐकलेल्या काही गोष्टींंवरुन वानखेडे विरुद्ध गंभीर आरोप लावले आहेत. एनसीबी मुंबई विभागाचे डिरेक्टर समीर वानखेडे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत."

"सध्या मी हे अॅफिटेव्हीट नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या डिरेक्टर जनरलला पाठवत आहे. यासंदर्भात त्यांनी योग्य ती कारवाई करावी," असे एनसीबीचे डीडीजी अशोक जैन यांनी प्रेसनोट मध्ये म्हटले आहे. (Aryan Khan Drugs Case: आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी प्रभाकर साईल यांच्या गौप्यस्फोटानंतर नवाब मलिक, संजय राऊत आक्रमक; दिवसभरातील ठळक घडामोडी)

ANI Tweet:

प्रभाकर साईल यांनी नेमके कोणते आरोप केले?

प्रभाकर साईल यांनी ते हे या प्रकरणातील साक्षीदार केपी गोसावी यांचे खासगी सुरक्षारक्षक असल्याचे म्हटले आहे. एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि केपी गोसावी यांनी आपल्याला क्रुझ ड्रग्ज छापा प्रकरणात साक्षीदार केले. मात्र, त्यांनी आपल्या कोऱ्या कागदावर सह्या करायला लावल्याचे म्हटले आहे. तसंच केपी गोसावीला 25 कोटींबद्दल बोलताना ऐकलं होतं आणि ते डील 18 कोटी रुपयांमध्ये करण्यात आल्याचं फायनल झालं, असंही साईल म्हणाले.