जम्मू कश्मीरच्या खोर्यात मागील 70 वर्षांपासून लागू असलेले कलम 370 आणि कलम 35 A यामुळे या राज्याला विशेष दर्जा होता. मात्र आता मोदी सरकारने जम्मू कश्मीरचं त्रिभाजन करून लद्दाख आणि जम्मू कश्मीरला केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करण्यात आलं आहे. या ऐतिहासिक निर्णयाचं स्वागत केल्यानंतर महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणूकीमध्ये भाजपाला आणि पर्यायाने शिवसेनेला फायदा मिळणार असल्याची चर्चा रंगत आहे. जम्मू कश्मीर मधून कलम 370 हटवल्यानंतर शिवसेनेने व्यक्त केला आनंद; आज देश खर्या अर्थाने स्वतंत्र झाला - उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
लोकसभा निवडणूकीपूर्वी पुलवामा दहशतवादी हल्ला आणि आता विधानसभा निवडणूकीच्या आधी कश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा हटवून भारतात पुन्हा देशप्रेमाची भावना निर्माण केली आहे. विधानसभेसाठी ही गोष्ट भाजपाच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे. . मुंबई: जम्मू कश्मीर मधील कलम 370 रद्द; शिवसेना भवनाबाहेर शिवसैनिकांचं सेलिब्रेशन सुरू
सध्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांकडून महाराष्ट्र दौरा आखण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपा आपलं विविध शक्तीप्रदर्शन करत असले तरीही आगामी निवडणूकीमध्ये ते युती करून निवडणूकीला सामोर जाणार असल्याचं म्हटलं जात आहे.
कॉंग्रेसकडून कलम 370 हटवल्याच्या विधेयकाला विरोध केला आहे. पण महाराष्ट्रासह देशात कमजोर झालेल्या कॉंग्रेस पक्षाला आता मुस्लीम मतं मिळण्याची शक्यता देखील कमी झाली आहे. त्यामुळे या गोष्टीचा फायदादेखील भाजपाला होणार आहे. सध्या महाराष्ट्रात प्रादेशिक पक्ष मनसे, एनसीपी देखील कमजोर झाली आहे.
महाराष्ट्रामध्ये पुढील काही महिन्यात विधानसभेची निवडणूक येऊन ठेपली आहे. त्यासाठी सगळेच पक्ष महाराष्ट्रामध्ये आपली शक्ती तपासून पाहत आहे. महाराष्ट्रासह पश्चिम बंगाल, दिल्लीमध्येही निवडणूका आहेत. त्यामुळे या ठिकाणीदेखील भाजपाला फायदा मिळू शकतो.