Sambhaji Bhide | (Photo Credit: Facebook)

शिवप्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी (Arrest Warrent) करण्यात आले आहे. कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकावेळी (Karnataka Assembly Election) आचारसंहिता भंग (Code of Conduct) केल्याप्रकरणी संभाजी भिडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणात तारखेला गैरहजर राहिल्यामुळे बेळगाव न्यायालयाने भिडे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे.

गेल्यावर्षी बेलगाव येथील येळ्ळूर गावात महाराष्ट्र मैदानावर कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला संभीजी भीडे यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावून तेथील उपस्थितांना मार्गदर्शन केले. 'येळ्ळूरचे महाराष्ट्र मैदान हे देशातील अव्वल दर्जाचे कुस्ती मैदान आहे. या मैदानाला तोड नसून त्या माजी आमदाराला हे मैदान उद्धवस्त करायचे होते. त्याला त्याची जागा दाखवून द्या. येत्या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व उमेदवारांना विजयी करुन मराठी बाणा दाखवा,' असे विधान भिडे यांनी या कार्यक्रमात केले होते. या विधानांमुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. (हेही वाचा - सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी कायद्याविरोधात नागपाड्यात आंदोलन करणाऱ्या 200 महिलांवर गुन्हा दाखल)

या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या 24 मार्च रोजी होणार आहे. संभीजी भिडे नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांच्यावर भीमा-कोरेगावर प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकबोटे आणि भिडेंवर कोरेगाव भीमा येथे दंगली भडकावण्याचे आरोप ठेवण्यात आले आहेत.