Arnab Goswami | (Photo Credits: ANI)

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांना जामीन (Arnab Goswami Bail) मंजूर केला आहे. अर्णब गोस्वामी आणि त्यांच्यासोबतच या प्रकरणात अटक झालेल्या आणखी दोघांनाही या प्रकरणात जामीन मंजूर झाला आहे. 50 हजार रुपयांच्या जातमुलचलक्यावर या तिघांना हा जामीन मंजूर झाला. दरम्यान, अर्नब गोस्वाी यांना जामीन देऊन दिलासा नाकारताना मुंबई हायकोर्टाकडून चूक झाली, असे निरीक्षणही सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे. दरम्यान, अर्णब गोस्वामी यांना जामीन मिळाल्यानंतर महाराष्ट्र सरकार अथवा पोलिसांची प्रतिक्रिया काय येते याबाबत उत्सुकता आहे.

महाराष्ट्र पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अटक केले होते. हे प्रकरण 2018 मध्यील आहे. वास्तुविषारत अन्वय नाईक आणि त्यांच्या आईने 2018 मध्ये आत्महत्या केली होती. झालेल्या अटकेविरुद्ध अर्नब गोस्वामी यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. परंतू, मुंबई उच्च न्यायालयाने अर्नब यांचा जामीन फेटाळला होता. मुंबई उच्च न्यायालयाने अर्नब यांना जामीन नाकारताना आपल्याला झालेली अटक ही आपल्या विशेषाधिकाराचे प्रकरण ठरत नाही, असेही म्हटले होते. (हेही वाचा, Arnab Goswami: अर्णब गोस्वामी यांच्याशी जवळीक महागात पडली, दोघे थेट निलंबित)

न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड व न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी यांच्या खंडपीठापुढे अर्णब गोस्वामी अटक प्रकरणी दाखल याचिकेवर सुनावणी झाली. भारतातील एक नामवंत वकील हरीष साळवे यांनी अर्णब गोस्वामी यांची बाजू न्यायालयात मांडली. अन्वय नाईक यांनी आपल्या आईची हत्या केली. त्यानंतर त्यांनी स्वत: आत्महत्या केली. तसेच, नाईक यांची कंपनी पाठिमागी सात-आठ वर्षांपासून आर्थिक अडचणींचा सामना करत होती, असा युक्तीवादही साळवे यांनी केला.