महाराष्ट्रातील तरुणांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली असून भारतीय सैन्य दलाने 10 दिवसाच्या नोकर भरती मेळाव्या द्वारा सोल्जर जनरल ड्युटी, सोल्जर टेक्निकल. सोल्जर टेक्निकल (एव्हिएशन अॅण्ड अॅम्युनिअशन), सोल्जर टेक्निकल (नर्सिंग असिस्टंट), सोल्जर टेक्निकल ( नर्सिंग असिस्टंट/ व्हेटरनरी), सोल्जर ट्रेडमॅन, सोल्जर स्टोअरकिपर टेक्निकल, शिपाई, हवलदार आणि सोल्जर ज्युनिअर कमिशन ऑफिसर या पदांसाठी भरती होणार आहे. महाराष्ट्रातून मुंबई शहर, मुंबई उपनगर, नाशिक, रायगड, पालघर, ठाणे या जिल्ह्यातील इच्छुक उमेदवार वरील पदांसाठी ऑनलाईन अर्ज करु शकतात. तसेच, 27 नोव्हेंबर 2019 ही अर्ज करण्याची अखेरची तारीख आहे.
भारतीय सैन्य दलात नोकरी करण्याची इच्छा बाळगणाऱ्या तरुणांनासाठी भारतीय सैन्य दलाने त्याच्या वेबसाईटवर नवी संधी निर्माण करुन दिली आहे. भारतीय सैन्य दलाने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, पुढील महिन्यात 10 ते 13 डिसेंबर दरम्यान ठाणे परिसरात नोकर भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यासाठी उमेदवाराला ऑनलाईन अर्ज करावा लागणार. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी अर्जदाराला भारतीय सैन्य दलाच्या अधिकृत वेबसाईवर भेट द्यावी लागणार आहे. तसेच नोकरीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवाराला नोकरीची संधी देण्यात येणार आहे.
लष्कर भरतीसाठी पात्रता निकष ऑनलाईन अर्ज आणि अधिक माहितीसाठी joinindianarmy.nic.in या वेबसाईट वर भेट द्या
निवड प्रक्रिया-
ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवारांची जिल्हा किंवा तालुका स्तरावर तपासणी केली जाणार आहे. प्रवेश पत्रावर तपासणीची वेळ, तारीख आणि ठिकाणाची माहिती दिली जाणार आहे. ऑनलाईन प्रक्रिया पार पडल्यानंतर प्रत्यक्ष भरतीच्या दिवशी शारीरिक आणि वैद्धकीय तपासणी केली जाणार आहे. दोन्ही तपासण्या यशस्वीरित्या पार पडल्यानंतर अर्जदारांची लेखी परीक्षा जानेवारी किंवा फेब्रुवारी माहिन्यात घेतली जाईल. त्यानंतरच उमेदवारांची प्रशिक्षासाठी निवड केली जाईल.