रोहित पवार (फोटो सौजन्य-फेसबुक)

स्थलांतरीत कामगार (Displaced Workers) आणि हातावर पोट असलेल्यांच्या राहण्याची व अन्नाची व्यवस्था करण्यासाठी महाविकासआघाडी सरकारने प्रत्येक जिल्ह्यात 'नोडल अधिकाऱ्यां'ची (Nodal Officers) नेमणूक केली आहे. राष्ट्रवादी नेत आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून प्रत्येक जिल्ह्यातील नोडल अधिकाऱ्याची नावे आणि मोबाईल नंबरची यादी शेअर केली आहे. नागरिकांना कोणतही अडचण असल्यास या अधिकाऱ्यांशी संपर्क करावा, असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

विस्थापित कामगारांच्या व्यवस्थेसाठी प्रत्येक जिल्ह्यात सरकारकडून नेमणूक करण्यात आलेल्या नोडल अधिकाऱ्यांची नावे रोहित पवार यांनी शेअर केली आहेत. राज्यातील नागरिक या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आपल्या अडचणी सांगू शकतात. 'लॉक डाऊन'मुळे केंद्र व राज्य सरकारने देशभर जिल्हाबंदी लागू केली आहे. त्यामुळे आहे तिथेच किंवा जवळच्या कारखान्यावर थांबा. तिथे तुमची जेवणाची सोय होईल. प्रत्येक कारखान्यांना ऊसतोड कामगारांची काळजी घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. तसेच अडचण आल्यास संबंधित तहसीलदारांशी बोला, असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे. सध्या देशात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे देशातील विविध भागातील कामगार अडकून पडले आहेत. हातावर पोट असल्याने या नागरिकांना सध्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. (हेही वाचा - लॉक डाऊनचा फायदा घेत मटणाचे भाव गगनाला भिडले; ठाण्यात 900 रुपये प्रती किलोने विक्री, विक्रेत्यावर कारवाई)

दरम्यान, यातील काही कामगारांनी आपल्या गावाकडे धाव घेतली आहे. या नागरिकांची राहण्याची व अन्नाची व्यवस्था करण्यासाठी राज्यातील अनेक संस्था पुढे सरसावल्या आहेत. याशिवाय सरकारकडून प्रत्येक जिल्ह्यात या कामगारांची व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या राज्यात कोरोना बाधितांची संख्या 320 वर पोहचली आहे. तर आतापर्यंत 12 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.