Pune Municipal Corporation (Photo Credit: Facebook)

पुण्यात लवकरच महानगरपालिकेच्या निवडणुका (Pune Municipal Corporation Election) पार पडणार आहेत. या निवडणुकींच्या अनुषंगाने विविध पक्षांनी कंबर कसली असून नागरिकांच्या वेगवेगळ्या प्रश्नावर नेतेमंडळी आक्रमक भूमिका घेतना दिसत आहेत. याचपार्श्वभूमीवर पुणे महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे केली आहे. यामुळे पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत हा मुद्दा पेट घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पुणे महानगपालिकेमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा प्रस्ताव पुणे पालिकेच्या मुख्य सभेदरम्यान मंजूर केला गेला. परंतु, तो प्रस्ताव सध्या राज्य शासनाकडे अंतिम मंजुरीसाठी रखडला गेला आहे. यामुळे पालिकेतील कर्मचारी प्रतीक्षेत आहेत. याच मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे पुणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ द्यावा, अशी मागणी पुण्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. हे देखील वाचा- Ulhasnagar: उल्हासनगर येथे शिवसेना कार्यकर्त्यांकडून भाजप नगरसेवकाला मारहाण

पुणे महानगरपालिकेत एकूण 164 जागा आहेत. बहुमतासाठी राजकीय पक्षाकडे 83 नगरसेवकांचे संख्याबळ असणे गरजेचे आहे. सध्या पुणे महानगरपालिकेवर भाजपची सत्ता आहे. यामुळे आगामी निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आणि कोणाची सत्ता येणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.