दक्षिण कोरियाची चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी कंपनी एलजी समूह आता अॅपल कंपनीसोबत आपली व्यावसायिक भागीदारी अधिक मजबूत करु इच्छिते आहे. वृत्तसंस्था आयएनएसने दिलेल्या वृत्तानुसार, मोबाईल उद्योगातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर एलजीच्या स्टोअरमध्ये (LG Store) आता अधिकृतरित्या अॅपल कंपनीचे गॅझेट्स (Apple Device) विकले जाऊ शकतात. सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या या वृत्तात म्हटले आहे की, लाईफकेअर वर आयफोन, आयपॅड आणि इतर अॅपल उत्पादनांसाठी एक विशेष मोहीम राबवली जाईल.
योनहाप वृत्तसंस्थेचा हवाला देत आयएनएसने म्हटले आहे की, असे पहिल्यांदाच घडते आहे समूहाने आपल्या कर्मचाऱ्यांच्या खरेदी उपक्रमासाठी कोणा इतर स्मार्टफोन निर्माता कंपनीच्या उपकरणांचे सादरीकरण केले आहे. मार्केटमध्ये असलेल्या चर्चांदरम्यान कंपनीचे हे पाऊल पुढे आले आहे. ज्यात एलजी इलेक्ट्रॉनिक्स मोबाइल व्यवसायाच्या प्रस्तानानंतर देशभरात आपल्या 400 स्टोर्समधये स्थानिक ग्राहकांना अॅपल उत्पादने विक्री होऊ शकतात. (हेही वाचा, Xiaomi Mi 11 Ultra चा 7 जुलै रोजी सेल; खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या किंमत, ऑफर्स आणि खासियत)
एप्रिल महिन्यात एलजी इलेक्ट्रॉनिक्सने घोषणा केली की, ते पाठिमागील अनेक वर्षांपासून नुकसान सहन करत आले आहेत. आता एप्रिल महिन्या केलेल्या घोषणेनुसार जुलैपर्यंत ते आपल्या उत्पादनातून स्मार्टफोन व्यवसायातून बाजूला होतील. मोबाईल व्यवसायातून एलजी बाहेर पडल्यानंतर अॅपल दक्षिण कोरियाई स्मार्टफोन बाजारात आपला व्यवसाय विस्तारीत करण्याचा विचार करत आहे.