Election | (Representational Image)

कृषी उत्पन्न बाजार समिती (Agricultural Produce Market Committee) अर्थातच एपीएमसी निवडणूक (APMC Election Results) पार पडली. निकाल लागला गुलालही उधळला. पण, या निवडणुकांमध्ये शहकाटशहांसोबतच हातमिळवणीचेही वेगळेच राजकारण पाहायला मिळाले. जसे की, काही ठिकाणी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकत्र लढणताना पाहायला मिळाले तर काही ठिकाणी राष्ट्रवादी आणि भाजप यांच्या हातमिळवणी तर कुठे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सामना होताना पाहायला मिळाला.

अकोल जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत सकार पॅनलने बाजी मारली. पण राष्ट्रवादीच्या भैय्यासाहेब तिडके यांच्या नेतृत्वाखालील या पॅनलमध्ये इतरही काही प्रमुख पक्षांचा समावेश होता. या ठिकाणी भाजप, शिवसेना आणि विरोधातील शेतकरी परिर्वतन पॅनलचा धुव्वा उढाल्याे पाहायला मिळाले. (कृषी उत्पन्न बाजार समितीशी संबंधित इतरही बातम्या पाहण्यासाटी येथे क्लिक करा)

आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समिती अनेक अर्थने आकर्षण आणि उत्सुकतेचे कारण ठरली होती. शरद पवार यांच्यवर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर सातत्याने टीका करणाऱ्या भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यामुळे या निवडणुकीत काय होते याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र, या ठिकाणी भाजपच्या गोपिचंद पडळकर यांनी स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत हातमिळवणी केली. तर त्यांच्या विरोधात शिंदे गटाचे आमदार अनिल बापर आणि काँग्रेस यांच्या पॅनलचे आव्हान होते. पण, अनपेक्षीत युत्या, आघाड्या होऊनही निकाल मात्र, समसमान लागला आहे. एकूण 18 पैकी दोन्ही बाजूंचे समसमान म्हणजेच प्रत्येकी 9 उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे आता सत्ता कोणाच्या बाजूने झुकते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चौरंगी लढत झाली. या ठिकाणी काँग्रे, राष्टवादी आणि भाजप तसेच उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गट तसेच आमदार अमोल मिटकरी यांचे पॅनेल रिंगणात होते. शिवाय इतर सर्वपक्षींना सोबत घेत वंचित बहुजन आघाडीनेही या ठिकाणी पॅनल लावले होते. मात्र, चौरंगी, बहुरंगी झालेल्या या निवडणुकीत अमोल मिटकरी यांच्या पॅनलचा दणदणीत पराभव झाला.