केंद्राच्या कृषी कायद्यावरून भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. रोहित पवार यांची कृषी कायद्यांविषयीची भूमिका दुटप्पी आणि नकलीपणाची असल्याचा आरोप भाजप नेते निलेश राणे यांनी केला होता. यावर आता रोहित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. निलेश राणे यांनी ते ट्विट घाईघाईत केले असावे. मी नेहमी अभ्यास करुनच बोलतो. कोणत्याही बातमीवरुन निष्कर्ष काढताना त्याचा व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे, अशा शब्दात रोहीत पवार यांनी निलेश राणे यांच्यावर टीका केली आहे.
निलेश राणे काही तासांपूर्वी एक फोटो ट्विट केला होता. तसेच रोहित पवार शेतकरी कायद्यांचा संदर्भ देऊन शेतकऱ्यांना भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्याच रोहित पवारांची स्वतःची कंपनी शेतकऱ्यांना करार करण्याचे फायदे सांगत आहेत, असेही ते म्हणाले होते. यावर रोहित पवार म्हणाले की, 'माझी एक पद्धत आहे. मी एखादा विषय हा अभ्यास करून मांडतो. माझी जशी पद्धत आहे, तशी त्यांची एखादी पद्धत असेल. त्यावर मी काही बोलू शकत नाही. पण आपण लिहित असताना त्याचा अभ्यास करावा, असा टोलाही रोहित पवार यांनी निलेश राणेंना लगावला आहे. हे देखील वाचा- Sharad Pawar On Maharashtra Governor: राज्यपालांना कंगनाला भेटायला वेळ आहे, पण माझ्या शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही; शरद पवार यांची टीका
दरम्यान, मी 4 डिसेंबरला कृषी कायद्याबाबात काही गोष्टी लिहल्या होत्या. यात असे लिहले होते की, करार शेती योग्य पद्धतीने केले तर त्याला विरोध करता येणार नाही. परंतु, केंद्र सरकारच्या कृषी कायद्यात असा एक नियम आहे की, शेतकरी व एखाद्या कंपनीत करार झाला. परंतु, काही दिवसानंतर शेतकऱ्याला त्या करारातून बाहेर पडायचे असेल तर त्यासाठी दोन्ही पार्टीची मान्यता असणे गरजेचे आहे, असे स्पष्टीकरण रोहित पवारांनी दिले आहे.