Arnab Goswami | (File Photo)

रिपब्लिक टीव्हीचे (Republic TV) एडिटर इन चीफ अर्नब गोस्वामी (Arnab Goswami)  यांना 2018 मध्ये एका इंटिरियर डिझानरला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक केली आहे. मात्र जामिन मिळावा यासाठी अर्नब यांनी बॉम्बे हायकोर्टात धाव घेतली होती. परंतु बॉम्बे हायकोर्टाने त्यांना अंतरिम जामिन देण्यास नकार दिला आहे. याच पार्श्वभुमीवर आज गोस्वामी यांनी अंतरिम जामिन मिळावा या कारणास्तव सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.

सोमवारी बॉम्बे हायकोर्टाने रिपब्लिक टीव्हीचे अर्नब गोस्वामी यांना अंतरिम जामिन देण्यास नकार दिला. न्यायाधीश एस के शिंदे आणि एम एस कार्णिक यांच्या खंडपीठाने असे म्हटले की, हायकोर्टाकडून असाधारण गोष्टींचा वापर करण्यासाठी अन्य काही ऑप्शन आहेत. पीठीने एकदा पुन्हा म्हटले की, कनिष्ठ न्यायालयात तुम्ही तुमची याचिका दाखल करु शकता. गोस्वामी यांच्यासह अन्य दोन जणांवर 2018 मध्ये एका इंटिरियर डिझायनर आणि त्याच्या आईला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोप आहे.(Republic TV चे डिस्ट्रीब्युशन असिस्टंट VP Ghanshyam Singh यांना मुंबई पोलिसांकडून अटक)

दरम्यान, गोस्वामी आणि अन्य दोन जणांनी त्यांना अंतरिम जामीन मिळावा यासाठी कोर्टाला अपील केले होते. यावर सुनावणी होत या प्रकरणी त्यांनी कनिष्ठ न्यायालयात जावे असे स्पष्ट केले. तर गोस्वामी यांच्यासह अन्य दोन जणांनी बेकायदेशीर अटक केल्याच्या प्रकाराला आव्हान देत जामिन मिळावा याची मागणी केली होगी. तर 4 नोव्हेंबरला गोस्वामी यांच्यासह या दोन जणांना अलीबाग येथून अटक केली गेली.