Param Bir Singh (Photo Credits: ANI)

अँटीलीया स्फोटक (Antilina Case) प्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Param Bir Singh) यांनी आरोप करुन पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. सचिन वाझे (Sachin Vaze) यांना तुरुंगात विवस्त्र केले जात असून त्यांना शिवीगाळही केली जात असल्याचा आरोप परमबीर सिंह यांनी केला आहे. शिवाय त्यांच्यावर दबावही टाकला जात असल्याचा परमबीर सिंह यांचा दावा आहे. निलंबीत असलेले सचिन वाझे यांची मुंबई पोलीस दलात पुन्हा नियुक्त करण्यासाठी आपल्यावर दबाव होता, असा जबाब परमबीर सिंह यांनी ईडीला काल दिला होता. त्यानंतर त्यांनी आजही आरोप करुन खळबळ उडवून दिली आहे.

अँटीलीया स्फोटक प्रकरणाची चौकशी चांदीवाल आयोगासमोर सुरु आहे. चौकशी दरम्यान चांदीवाल आयोगाच्या कार्यालयात सचिन वाझे आणि अनिल देशमुख यांची भेट झाली होती. या वेळी अनिल देशमुख यांनी वाझे यांना ईडीला दिलेला जबाब परत घ्यावा यासाठी दबाव टाकला होता. या भेटीवेळी दोघांमध्ये बरीच चर्चा झाली, असाही आरोप परबमबीर सिंह यांनी केला आहे. अनिल परब आणि सचिन वाझे यांच्यात 30 नोव्हेंबर 2021 रोजी चांदीवाल आयोगाच्या सुनावणीदरम्यान भेट झाली होती. (हेही वाचा, Param Bir Singh: परमबीर सिंह पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात; तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकत असल्याचा अनिल देशमुख यांच्यावर आरोप)

ईडीला दिलेल्या जबाबत परमबीर सिंह यांनी म्हटले आहे की, सचिन वाझे मुंबई गुन्हे शाखेच्या कोठडीत असताना ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी त्यांच्यासोबत चर्चा केली होती. या चर्चेवेळी लक्ष्मीकांत पाटील यांनी सचिन वाझे यांच्यावर दबाव टाकला होता. पाटील आणि वाझे यांच्यामध्ये चांदीवाल आयोगाबाबतत एक गुप्त बैठक झाल्याचेही परमबिर सिंह यांनी म्हटले आहे.