Pandharpur Crime: एकतर्फी प्रेमाने घेतला आणखी एक बळी, निर्घृणपणे केली हत्या, पंढरपूर हादरलं
Crime | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Pandharpur Crime: महाराष्ट्रातील पंढरपूर (Pandahrpur) गावातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने संपुर्ण गावचं नव्हे तर जिल्हा हादरला आहे. तरूणाने १८ वर्षाच्या मुलीचा खून केला आहे. धारदार शस्त्राने तरुणीच्या पाठीवर डोक्यात आणि मानेवर वार केला  आहे. हा धक्कादायक प्रकार पंढरपूर येथील कोळा येथे घडला आहे. तरुणी महाविद्यालयात शिकत होती. शनिवारच्या रात्री ही घटना घडली.

पंढरपुरातील सांगोला तालुक्यात एकतर्फी प्रेमाने तरुणीची निर्घृण हत्या केली. काल रात्री आठच्या सुमारास आरोपीने तरुणीवर जीवघेणा हल्ला केला. ही घटना तरुणीच्या घराजवळ घडली. मृत तरूणीचे नाव ऋतुजा मदने आहे. ही महाविद्यालयात शिक्षण घेत होती. हत्येनंतर मृत तरूणीचे मामा यांनी पोलीसांत तक्रार दाखल केली. संशयित सचिन मारूती गडदे नावाच्या तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरु केला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार, आरोपी फरार आहे.पोलीसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून  शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवून दिला. या प्रकरणातील संशयित सचिन गडदे याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.