IAS Puja Khedkar: प्रोबेशनरी IAS अधिकारी पूजा खेडकर (Puja Khedkar) यांच्याबाबत रोज नवनवीन खुलासे होत आहेत. पूजा खेडकर यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांच्या चौकशीसाठी केंद्र सरकारने एक समिती स्थापन केली आहे. मात्र, हे आरोप सिद्ध झाल्यास पूजा खेडकरला नोकरी गमवावी लागू शकते, असे मानले जात आहे. वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेताना पूजा खेडकर यांननी स्वत:ला तंदुरुस्त घोषित केले होते. तसेच आयएएसची नोकरी मिळविण्यासाठी त्यांनी अपंगत्वाचे प्रमाणपत्र सादर केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
श्रीमती काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालय आणि सामान्य रुग्णालय, संचालक अरविंद भोरे यांनी प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या MBBS प्रवेशासंदर्भात बोलताना सांगितलं की, 'तिने 2007 मध्ये प्रवेश घेतला होता. तिने आरक्षणाचे काही प्रमाणपत्र दिले होते. यात जात वैधता आणि नॉन-क्रिमी लेयर प्रमाणपत्र याचा समावेश होता. तिने वैद्यकीय तंदुरुस्तीचे प्रमाणपत्र देखील सादर केले होते, ज्यामध्ये कोणत्याही अपंगत्वाचा उल्लेख केलेला नाही.' (हेही वाचा -IAS Pooja Khedkar Family Absconding: वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरचे पालक फरार, पुणे पोलिसांकडून शोध सुरू)
सध्या पूजा खेडकर या चांगल्याचं चर्चेत आल्या आहेत. त्यांनी पदाचा गैरवापर केल्यामुळे त्यांची पुण्याहून वाशीम येथे बदली करण्यात आली. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी मुख्य सचिवांना पत्र लिहिल्यानंतर प्रोबेशनरी आयएएस पूजा खेडकर यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात जिल्हाधिकाऱ्यांनी पूजा खेडकरचे अनेक कारनामे उघड केले. (हेही वाचा:IAS Officer Puja Khedkar यांच्या आईचा अरेरावीचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल; पुण्यातील मुळशी येथे जमिनीच्या वादातून शेतकऱ्याला बंदुकीचा धाक दाखवून केली दमदाटी (Viral Video) )
#WATCH | Pune, Maharashtra: On Trainee IAS Officer Puja Khedkar, Shrimati Kashibai Navale Medical College and General Hospital, Director Arvind Bhore says, "She took admission in 2007... She got admission through CET, where she gave some certificates of reservation... She had… pic.twitter.com/GP7wyhCGP0
— ANI (@ANI) July 15, 2024
IAS पूजा खेडकर या 2023 बॅचच्या अधिकारी आहेत. रुजू होताच त्यांनी सर्वप्रथम एका कंत्राटदाराकडून भेट म्हणून ऑडी कार घेतली. मुंबई पोलीस आता याचा तपास करत आहेत. जातीचा दाखला देऊन तिला आरक्षण मिळाले पण आता स्वतः पूजा खेडकर यांच्याकडे करोडोंची संपत्ती असल्याची माहिती समोर आली आहे.