आजपासून अण्णा हजारे राळेगणसिद्धी येथे बेमुदत उपोषणाला बसणार
Anna Hazare (Photo Credits: IANS)

लोकपाल आणि लोकायुक्त नियुक्तीच्या मागण्यांवर ठाम राहून बुधवारी (30 जानेवारी) जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) बेमुदत उपोषणाला राळेगणसिद्धी (Ralegan Siddhi) येथे बसणार आहेत. तर मंत्रिमंडळाच्या बैठकीत अण्णा हजारे यांच्या उपषोणाला पाठिंबा देण्यात आला आहे. मात्र विधानसभेच्या मंजुरीशिवाय कायद्यात रुपांतर होणार नसल्याने अण्णा हजारे यांनी उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या वर्षीसुद्धा लोकपाल आणि लोकायुक्तीच्या मुद्यांवरुन हजारे यांनी उपोषण केले होते. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीमुळे आंदोलन पाठी घेतले होते. या मुद्द्यंवर पुढील सहा महिन्यात निर्णय होण्याची शक्यता वर्तविली होती. परंतु आश्वासने देऊन ही कोणता निर्णय घेण्यात आला नसल्याचे हजारे यांनी म्हटले आहे.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना सुद्धा पत्र पाठवून त्यांच्याकडून याबद्दल कोणतेही उत्तर आले नसल्याची खंत हजारे यांनी व्यक्त केली. त्यामुळे सरकारकडून या मुद्द्यांवरुन कानाडोळा केला जात असल्याने 30 जानेवारी पासून राळेगणसिद्धी येथे उपोषणाला बसणार असल्याचा इशारा दिला. तसेच आज राळेगणमधील ग्रामस्थांनी सर्व व्यवहार बंद ठेवणार असल्याचे सांगितले आहे.