जनावरांची तस्करी करताना रोखले, चालकाने पोलिसाला चिरडले
(संग्रहित प्रतिमा)

चंद्रपूरात (Chandrapur) जनावरांची तस्करी करणाऱ्या एका वाहनाला पोलिसाने रोकल्याने चालकाने चक्क पोलीस कर्माचाऱ्याच्या अंगावर गाडी चढवली. या प्रकरणी पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला.

नागपूर- चंद्रपूर महामार्गावरुन जनावरांची तस्करी करत असलेली कार येणार असल्याचे पोलिसांना सूत्रांकडून कळले होते. या माहितीच्या आधारे पोलिसांनी महामार्गावरुन येणाऱ्या गाड्यांची तपासणी करण्यास सुरुवात केली. तसेच रस्त्यावर प्रत्येक ठिकाणी नाकाबंदी करुन बॅरिकेट्स लावले होते. त्यावेळी पोलीस कर्मचारी प्रकाश मेश्राम यांची खांबाडा येथे ट्युडी लावली होती.

दरम्यान, जनावरांची तस्करी करणारी गाडी तेथे आली आणि पोलिसांनी त्या गाडीला थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु वाहनचालकाने पोलिसांना न जुमानता प्रकाश मेश्राम उभे असलेल्या ठिकाणी जोरात धडक देऊन पसार झाले. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.