'नाव घेतल्याने कोणी हिंदुहृदयसम्राट होत नाही' अनिल परब यांच्याकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर टीका
Anil Parab And Raj Thackeray (Photo Credit: Facebook/ PTI)

महाराष्ट्र निवनिर्माण सेनेने (Maharashtra Navnirman Sena) 23 जानेवारी पहिले राज्यव्यापी अधिवेशन मुंबई (Mumbai) येथे पार पडले. दरम्यान, मनसेने आपल्या पक्षाच्या झेंड्यात बदल केला असून पुढील काळात हिंदुत्वाच्या मुद्यावर राजकारण करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, मनसेच्या बदलेल्या नव्या भुमिकेवर शिवसेनेच्या (Shiv Sena) अनेक नेत्यांनी जोरदार प्रहार केला आहे. शिवसेना नेते अनिल परब (Anil Parab) यांनीही यात आणखी भर घातली आहे. बाळासाहेबांचे नाव घेतल्याने हिंदुहृदयसम्राट होत नाही. तसेच झेंडा घेतला म्हणून हिंदूची मत फिरत नाही, अशा शब्दात अनिल परब यांनी मनसेवर टीका केली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या पक्षाच्या झेंड्यात बदल करुन आपल्या पक्षाची नवी विचारसारणी जनतेसमोर मांडली आहे. यावरून राजकारण पेटले असून शिवसेना विरूद्ध मनसे असे वातावरण निर्माण झाले आहे. दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर शाब्दिक हल्ला चढवत आहेत. यातच अनिल परब यांनीही मनसेच्या बदलत्या भुमिकेवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. मनसेचा पूर्वीचा झेंडा हा विविध धर्मियांना आकर्षित करण्यासाठी वापरला होता, त्याचे काय झाले? बाळासाहेबांनी हिंदुंसाठी जो त्याग केला आहे, तसे योगदान कोणत्या नेत्यांनी दिले का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच बाळासाहेबांचे नाव घेतल्याने कोण हिंदुहृदयसम्राट होत नाही. झेंडा घेतला म्हणून हिंदुची मत फिरत नाही, असे बोलत अनिल परब यांनी मनसेवर टीकास्त्र सोडले आहे. हे देखील वाचा- राज्यात देशविरोधी कट शिजत आहे, याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुरावे द्यावेत- सत्तेज पाटील

दरम्यान, राज ठाकरे मनसे अधिवेशनात म्हणाले होते की, काही विशिष्ट भागात मौलवींचा वावर वाढला असून तो काळजी वाढवणारा आहे. यावर राज्याचे गृहराज्यमंत्री सत्तेज पाटील यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हणाले होते की, लोकसभा निवडणुकीनंतर राज ठाकरे यांची राजकीय भूमिका बदललेली आहे. त्याला अनुसरून ते विधान करीत आहेत. अशा प्रकारचे विधाने करण्यापेक्षा त्यांनी पुरावे दिल्यास उचित कार्यवाही करता येईल, असेही पाटील यांनी स्पष्ट केले होते.