
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ( Maharashtra Navnirman Sena) गुरूवारी 23 जानेवारी 2020 रोजी मुंबई (Mumbai)येथे पहिले राज्यव्यापी अधिवेशन पार पडले. या अधिवेशनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्य आणि केंद्र सरकारवरही जोरदार निशाणा साधला होता. तसेच राज्यासह देशाच्या काही भागांमध्ये देशा विरोधात कट शिजत असल्याचे विधान केले होते. यावर राज्याचे गृहराज्यमंत्री सत्तेज पाटील (Satej Patil) यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राज्यात देशविरोधी कट शिजत आहे असे विधान करणारे राज ठाकरे यांनी याबाबतचे पुरावे द्यावेत असे अवाहन सत्तेच पाटील यांनी दिले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या झेंड्यातील रंगासह पक्षाच्या विचारधारेतही बदल केला आहे. मुंबई येथे पार पडलेल्या अधिवेशात मनसे पक्षात मोठा बदल पाहायला मिळाला. दरम्यान, राज ठाकरे यांनी सत्ताधारी पक्षांवर शाब्दीक हल्ला चढवला. त्यावेळी राज ठाकरे म्हणाले होते की, राज्यासह देशाच्या काही भागांमध्ये देशविरोधी कट शिजत आहे, याची माहिती मी लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहे. यावर सत्तेज पाटील म्हणाले की, अशा पद्धतीची माहिती गृह विभागाकडे वर्षभर येत असते. तेव्हा त्याची योग्य ती दक्षता पोलीस प्रशासन घेत असते. अशाप्रकारे काही घटना घडत असल्याचे राज ठाकरे यांना माहित असेल तर त्यांनी या संदर्भातील पुरावे राज्याचे पोलीस महासंचालक यांच्याकडे द्यावेत. जेणेकरून त्याची दखल घेऊन योग्य ती काळजी घेता येईल, असे अवाहन सत्तेज पाटील म्हणाले आहेत. हे देखील वाचा-प्रकाश आंबेडकर यांच्याकडून 'महाराष्ट्र बंद' मागे; राज्यभरात बंद पूर्णपणे यशस्वी झाल्याचा दावा
दरम्यान, राज ठाकरे यांनी काही विशिष्ट भागात मौलवींचा वावर वाढला असून तो काळजी वाढवणारा आहे, असेही वक्तव्य केले होते. यावर सत्तेज पाटील यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हणाले की, लोकसभा निवडणुकीनंतर राज ठाकरे यांची राजकीय भूमिका बदललेली आहे. त्याला अनुसरून ते विधान करीत आहेत. अशा प्रकारचे विधाने करण्यापेक्षा त्यांनी पुरावे दिल्यास उचित कार्यवाही करता येईल, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.