Anganwadi Workers Pension and Gratuity: अंगणवाडी सेविका पेन्शन आणि ग्रॅच्युटी बाबत मोठी बातमी, जाणून घ्या काय मिळणार लाभ?
Anganwadi Workers | (File Image)

राज्यभरातील अंगणवाडी सेविका (Anganwadi Workers) करत असलेल्या मागण्यांना मोठे यश येण्याची शक्यता आहे. राज्य सरकार अंगणवाडी सेविकांना लवकरच सेवानिवृत्ती (Anganwadi Workers Pension) आणि ग्रॅच्युटी (Anganwadi Workers Gratuity) देण्याच्या विचारात आहे. ज्यामुळे या सेविकांना 1 लाख 55 जार ते 1 लाख 76 हजार रक्कम मिळू शकते. महत्त्वाचे म्हणजे हा लाभ अंगणवाडी सेविका आणि मदतनीस अशा दोघींनाही घेता येणार आहे. राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील दोन लाख अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना हा लाभ घेता येऊ शकतो.

मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयाची शक्यता

दरम्यान, प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. लवकरच याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. सध्यास्थितीमध्ये राज्य सरकारमध्ये अंगवाडी सेविका आणि मदतनीस यांना नेमकी किती पेन्शन (सेवानिवृत्ती) द्यायची यावर मंथन सुरु आहे. आगामी मंत्रिमंडळ बैठकीत महिला व बालविकास विभागाद्वारे हा प्रस्ताव येण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. (हेही वाचा, Bhaubeej Bhet: राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्यासाठी खुशखबर; सरकारकडून मिळणार 'भाऊबीज भेट', लवकरच होणार वितरीत)

निवडणुकांच्या तोंडावर मोठा निर्णय?

वेतन आणि इतर सेवासुवीधांबाबत विविध मागण्यांसाठी राज्यभरातील अंगणवाडी सेविका आक्रमक झाल्या आहेत. या आधीही त्यांनी अनेक आंदोलने, संप, मोर्चे केले आहेत. आताही त्या आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. मात्र, आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर तळागाळात काम करणाऱ्या वर्गाकडून होणारी आंदोलने आणि सरकारविरोधात तापले जाणारे वातावरण हिताचे नाही, हे सरकार जाणून आहे. परिणामी निवडणुकांच्या तोंडावर राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची सरकारी सूत्रांची माहिती आहे. राज्य सरकारने जर हा निर्णय घेतला तर राज्यभरातील जवळपास 1 लाख 10 हजार अंगणवाडी सेविका आणि जवळपास 90 हजार मदतनीस यांना पेन्शन आणि ग्रॅज्युटीचा लाभ मिळू शकतो. (हेही वाचा, Anganwadi Worker Salary: अंगणवाडी सेविकांचे मानधन 1500 रुपयांनी वाढले, मोबाईल आणि पेन्शन योजनेचाही मिळणार लाभ; राज्य सरकारचा निर्णय)

पेन्शन म्हणजे काय

पेन्शन या शब्दाचा अर्थ एखाद्या व्यक्तीला त्याच्या/तिच्या आयुष्यासाठी निवृत्तीनंतरच्या हप्त्यांमध्ये दिलेली ठराविक रक्कम. हे नियोक्त्याद्वारे प्रदान केले जाते, जी माजी कर्मचाऱ्यांना किंवा माजी कर्मचाऱ्याच्या हयात असलेल्या आश्रितांना, संस्थेला प्रदान केलेल्या सेवांमुळे आर्थिक लाभ मिळतो. हा लाभ देणारी सरकारी संस्था किंवा इतर कोणतीही कंपनी असू शकते. ही एक दीर्घकालीन बचत योजना आहे, जी शाश्वत स्वरूपात आहे.

ग्रॅच्युइटी म्हणजे काय

ग्रॅच्युइटीची व्याख्या निवृत्तीनंतरचा सामाजिक सुरक्षा लाभ म्हणून केली जाऊ शकते. जी कर्मचाऱ्यांना नियोक्त्याने आस्थापनांना प्रदान केलेल्या सेवांमुळे प्रदान केली जाते. सोप्या भाषेत सांगायचे तर, ग्रॅच्युइटी ही ओळखीची खूण आहे. कर्मचारी जेव्हा विशिष्ट कालावधीनंतर नोकरी सोडतो किंवा निवृत्त होतो तेव्हा कंपनीमध्ये केलेल्या योगदानासाठी काही रक्कम एकरकमी दिली जाते. ही रक्कम या योजनेंतर्गत, कर्मचाऱ्याला सेवेची वर्षे आणि शेवटचा काढलेला पगार यावर अवलंबून एकरकमी रक्कम दिली जाते. त्याला ग्रॅच्युइटी म्हणतात.