Ulhasnagar Car Accident: कल्याण जवळील उल्हासनगर परिसरात कार अनियंत्रित होऊन अपघात झाला आहे.ही भीषण घटना जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उल्हासनगरच्या कॅम्प क्रमांक ३ येथील ईगल हॉटेलजवळ ही घटना घडली आहे. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कारमध्ये दोन जण प्रवास करत होते अशी माहिती समोर आली आहे. हेही वाचा- मद्यधुंद व्यक्तीने पायी चालतानाही केले वाहतूक नियमांचे पालन;
मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव कार अनियंत्रित झाल्यानंतर थेट बालाजी टी हाऊसच्या दुकानात घुसली, ही घटना सकाळी साडेआठच्या सुमारास घडली आहे. दुकानात सकाळी गर्दी होती त्यावेळी ही दुर्घटना घडली. कार थेट दुकानात घुसल्याने एका व्यक्तीला दुखापत झाली आहे. तसेच दोन मोटार सायकलचे नुकसान झाले आहे. चहाच्या दुकानात आलेल्या ग्राहकाला दुखापत झाली. चंद्रकांत शिंदे असं जखमीचे नाव आहे. जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातामुळे दुकानेचे देखील नुकसान झाले आहे.
उल्हानगरमध्ये चहाच्या दुकानात घुसली कार pic.twitter.com/iQPp7Gy8zd
— Ruchika (@Ruchika66964659) March 14, 2024
या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे तपासत आहे. कार अनियंत्रित होऊन दुकानात घुसली असे सीसीटीव्हीत दिसत आहे. पोलिसांनी या अपघाताची तक्रार नोंदवून घेतली आहे. पुढील कारवाई लवकर करण्यात येईल अशी माहिती दिली आहे. या अपघातानंतर परिसरात लोकांची पळापळ होऊ लागली. अपघातात कारचा समोरील भाग चक्काचूर झाला आहे.