Coronavirus Outbreak | Representational Image | (Photo Credits: IANS)

Coronavirus Cases In Aurangabad: महाराष्ट्रात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. राज्यातील विविध जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत आहे. अशातचं औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यात आज सकाळी 166 नवे कोरोना बाधित रुग्ण (Corona Positive Patient) आढळून आले आहेत. यामध्ये औरंगाबाद मनपा हद्दीतील 101 तर ग्रामीण भागातील 65 रुग्णांचा समावेश आहे. यात 90 पुरूष तर 76 महिलां रुग्ण आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 7504 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यातील 4033 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून 330 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या 3141 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने माहिती दिली आहे. (हेही वाचा - पुणे: कोविड-19 रुग्णाला 8000 रुपयांचे अवाजवी बिल आकारल्यामुळे संजीवनी अम्ब्युलन्स सव्हिसेस विरोधात गुन्हा दाखल)

दरम्यान, बुधवारी औरंगाबाद जिल्ह्यात सकाळी 166 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली होती. यामध्ये औरंगाबाद मनपा हद्दीतील 99 तर ग्रामीण भागातील 67 रुग्णांचा समावेश होता. दरम्यान, महाराष्ट्रात बुधवारी तब्बल 6 हजार 603 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर,198 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 2 लाख 23 हजार 724 इतकी झाली आहे. आतापर्यंत 9 हजार 448 जणांचा मृत्यू झाला असून 1 लाख 23 हजार 192 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.