Engineering Student Committed Suicide: नागपूर (Nagpur) शहरातून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका 25 वर्षीय विद्यार्थ्याने परीक्षेत काही विषयात कमी गुण मिळाल्याने आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली आहे. यासंदर्भात पोलिसांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला माहिती दिली आहे. वृत्तानुसार, बुधवारी सकाळी विद्यार्थ्याच्या वडिलांना आपला मुलगा वैशाली नगर बागेजवळ त्यांच्या घरात पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. यांदर्भात पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
प्राप्त माहितीनुसार, मृत विद्यार्थी त्याच्या पालकांसह रात्रीचे जेवण करून त्याच्या खोलीत गेला. नंतर तो त्याच्या वडिलांना तो मृतावस्थेत आढळला. मृत हा नागपुरातील एका खाजगी महाविद्यालयात शिकत असून चौथ्या वर्षात होता. तपासादरम्यान, पोलिसांना कळले की तो त्याच्या सहाव्या सेमिस्टरमध्ये काही विषयात नापास झाला होता. यामुळे त्याने असे टोकाचे पाऊल उचलले. (हेही वाचा - Virar Shocker: आई ओरडली म्हणून 16 वर्षीय मुलाची आत्महत्या, विरारमधली घटना)
पोलिसांनी सांगितले की, विद्यार्थ्याचे वडील सरकारी विभागात लिपिक म्हणून काम करतात. पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. दुसऱ्या एका घटनेत मोबाईल फोनवर जास्त वेळ घालवल्याने 19 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीनी आई ओरडल्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. रेणुका काळे असे या विद्यार्थिनीचे नाव असून ती पदवी प्रथम वर्षाची विद्यार्थिनी होती.
वडिलांच्या निधनानंतर रेणुकाचे पालनपोषण तिची आई सीमा करत होती. तिच्या आईचे किराणा मालाचे दुकान आहे. तिच्या मैत्रिणी आणि शेजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, रेणुका ही एक हुशार विद्यार्थिनी होती. मात्र, अलिकडे ती मोबाईल फोनचा जास्त वापर करत होती. रेणुका सोमवारी दुपारी तिच्या फोनवरून ब्राउझ करत होती तेव्हा सीमाने तिला अभ्यासाकडे दुर्लक्ष केल्याबद्दल फटकारले. या वादानंतर विद्यार्थिनीने आत्महत्या केली.