'वाईट नेता मिळणे ही महाराष्ट्राची चूक नाही' म्हणत अमृता फडणवीस यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्र
अमृता फडणवीस (Photo Credits-Twitter)

विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस गेल्या काही दिवसांपासूनच चर्चेत आहेत. तर काही दिवसांपूर्वी अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका करत लोकांसाठी प्रामाणिकपणे काम करावे लागते असे बोल सुनावले होते. मात्र आता पुन्हा एकदा त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्र सोडले आहे. अमृता फडणवीस यांनी शनिवारी केलेले ट्वीटवरुन जोरदार चर्चा होत असून त्यामधून ठाकरे सरकारवर पुन्हा टीका केली आहे. त्यांनी ट्वीट करत असे म्हटले आहे की,' वाईट नेता मिळणे ही महाराष्ट्राची चूक नाहीये पण त्या नेत्यासोबत राहणे ही चूक' आहे.

राज्यात ठाकरे सरकार आल्यानंतर विरोधक संतापले आहेतच पण अमृता फडणवीस या सुद्धा त्यांच्यावर टीका करताना दिसून येत आहेत. त्यामुळे शिवसेना आणि अमृता फडणवीस या दोघांमध्ये आरोप प्रत्योरोप होत असल्याचे सध्या दिसून येत आहे. तर एक्सिस या खासगी बँकेत बहुतांश सरकारी कर्मचाऱ्यांची बँक खाती आहेत. ती आता लवकरच शासकीय बँकेत वळवण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर अॅक्सिस बँकेत अमृता फडणवीस एका मोठ्या पदावर कार्यरत होत्या. मात्र आता बँकेतील खाती वळवण्याच्या विचारावरुन सुद्धा त्यांनी असे म्हटले आहे की, सरकारने विचारपूर्वक निर्णय घेणे आवश्यक आहे. एवढेच नाही अशा प्रकारचा निर्णय घेत मला आणि देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केले जात असल्याचा राग सुद्धा व्यक्त केला आहे.(अमृता फडणवीस यांचे शायरीच्या माध्यमातून निषेध करणाऱ्यांना प्रत्त्यूत्तर)

Amruta Fadnavis Tweet:

काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांच्या विरोधात वादग्रस्त विधान केले होते. या विधानाच्या आधारावर अमृता फडणवीस यांनीही ट्विटरच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, अमृता फडणवीस यांचे ट्विट पाहून शिवसैनिक अधिकच तापले होते. यामुळे शिवसैनिकांनी देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांचा जाहिर निषेध केला होता