महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘नव्या भारता'चे (New India) जनक अशी उपाधी देऊन देशात दोन ‘राष्ट्रपिता’ असल्याचे सांगितले. बँकर आणि गायिका अमृता अभिरुप न्यायालयात मुलाखतीदरम्यान म्हणाल्या, आपल्याकडे दोन 'राष्ट्रपिता' आहेत. नरेंद्र मोदी हे ‘नव्या भारता’चे जनक आहेत आणि महात्मा गांधी हे पूर्वीच्या काळातील राष्ट्रपिता आहेत.” अमृता फडणवीस यांच्या वक्तव्यावर काँग्रेसच्या नेत्या आणि महाराष्ट्राच्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी जोरदार टीका केली आहे. ठाकूर यांनी म्हटले की, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीचे पालन करणारे लोक पुन्हा पुन्हा गांधीजींना मारण्याचा प्रयत्न करत असतात. ते असेच बोलत राहतात, कारण खोटे बोलून आणि गांधींसारख्या महान व्यक्तींची बदनामी करून इतिहास बदलण्याचा त्यांचा उद्देश आहे."
अभिरूप न्यायालयाला दिलेल्या मुलाखतीत अमृता यांनी पाठिमागील वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राष्ट्रपिता म्हणण्याबद्दल मुलाखतकाराने विचारले होते. या प्रश्नाच्या उत्तरादाखल अमृता म्हणाल्या, महात्मा गांधी हे देशाचे पिता आहेत आणि मोदी हे 'न्यू इंडिया'चे जनक आहेत. त्या म्हणाल्या आम्हाला दोन राष्ट्रपिता आहेत. नरेंद्र मोदी हे ‘न्यू इंडिया’चे जनक आहेत आणि महात्मा गांधी हे त्या (पहिल्या) युगाचे जनक आहेत.” छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना विरोधकांकडून टीकेला सामोरे जावे लागले अशा वेळी अमृताची टिप्पणी आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. (हेही वाचा, Amruta Fadnavis On Governor: त्यांना काहीतरी वेगळे सांगायचे होते आणि त्याचा अर्थ वेगळा निघाला, अमृता फडणवीसांचा राज्यपालांना पाठिंबा)
ट्विट
यह अमृता फडणवीस हैं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की पत्नी। नागपुर के एक कार्यक्रम में इन्होंने कहा कि महात्मा गांधी देश के राष्ट्रपिता हैं, नरेंद्र मोदी नए भारत के राष्ट्रपिता। अमृता जी के अनुसार इस देश के दो राष्ट्रपिता हैं! pic.twitter.com/MLyFZVdEFa
— sohit mishra (@sohitmishra99) December 21, 2022
विरोधकांनी टीका केल्यानंतर, कोश्यारी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून त्यांची भूमिका स्पष्ट केली आणि ते म्हणाले की "एवढ्या महान व्यक्तिमत्त्वाचा अपमान करण्याचा विचार कधीही करू शकत नाही". यापूर्वी शिवाजी महाराजांचा अपमान केल्याप्रकरणी विरोधी महाविकास आघाडीने कोश्यारी यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.