Amravati Murder Case: अमरावती मध्ये शिवसेना शहरप्रमुखाची निर्घुण हत्या; डोळ्यात तिखटपूड टाकून सपासप वार
Representational Image (Photo Credits: Pixabay)

शिवसेनेच्या (Shiv Sena) तिवसा (Tivsa) शहराच्या प्रमुखाच्या हत्येने सध्या अमरावती (Amaravati) मध्ये एकच खळबळ उडाली आहे. अमोल पाटील (Amol Patil) असं त्याचं नाव असून आशीर्वाद वाईन बारसमोर त्यांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान ही घटना शनिवार, 26 जून रात्री 10.30 च्या सुमारास घडली आहे. दरम्यान अमोल वर 2 वर्षांसाठी तडीपारीची नोटीस होती. (नक्की वाचा: Pune: पुण्यात गुन्हेगारीचे सत्र सुरुच; तडीपार गुंडाकडून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाची हत्या, कारण अस्पष्ट ).

मीडीया रिपोर्ट्सनुसार, अमोल पाटील काही मित्रांसोबत राष्ट्रीय महामार्गाजवळ असलेल्या एका वाईन बार जवळ काल रात्री आले. बार बंद असल्याने ते जवळच बसले होते. काही वेळातच 5 जण त्याच्या जवळ आले आणि त्यांनी डोळ्यात मिरचीची पूड टाकली. संधी साधून अमोल पाटील यांच्यावर सपासप वार करून आरोपींनी तेथून पळ काढला. यामध्ये अमोल पाटीलचा जागीच मृत्यू झाला.

अमरावती पोलिसांनी रात्रीच चार जणांना अटक केली आहे तर एकाचा शोध सुरू आहे. घटनास्थळी पोहचून पोलिसांनी पंचनामा नोंदवून घेतला आहे. अमोल पाटील यांच्यावर 2 खूनाचे आरोप होते. सध्याच्या प्राथमिक अंदाजावरून अमोल पाटील यांची हत्य अवैध धंद्यामधून झाल्याचा अंदाज आहे. वर्दळीच्या रस्त्यावर अशाप्रकारे खून झाल्याने शहरातील कायदा व सुवस्था बाबत देखील आता प्रश्न उभे राहिले आहेत.